May 26, 2025 2:59 PM May 26, 2025 2:59 PM
8
राज्यात मोसमी पावसानं पदार्पणातच मोडला १०७ वर्षांचा विक्रम
राज्यात नैऋत्य मोसमी पावसानं १०७ वर्षांचा विक्रम मोडत वेळेआधीच प्रवेश केला आहे. मुंबईत मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागांत, तसंच रेल्वेरुळांवर पाणी भरलं आहे. विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत. शहरातल्या ९६ धोकादायक इमारतींमधल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हवामान विभागानं आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढच्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. पुढचे काही दिवस मुंबई आणि राज्...