September 23, 2025 3:20 PM September 23, 2025 3:20 PM

views 32

Cabinet Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

मुंबईतल्या घाटकोपर इथं गेल्या वर्षी बेकायदा फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भातल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल आज  मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत शिफारशींसह स्वीकारला. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांवरच्या कार्यवाहीचा कृती अहवालही मंत्रिमंडळानं स्वीकारला आणि संबंधित विभागांना एका महिन्यात कार्यवाही करायचे निर्देश दिले.    मुंबईतल्या अंधेरी इथं सरदार वल्लभभाई पटेल नगर इथं म्हाडाच्या माध्यमातून १२२ संस्थांच्या, तसंच ३०७ वैयक्तिक भूखंडाव...

August 5, 2025 3:29 PM August 5, 2025 3:29 PM

views 9

एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी

राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही सरकारनं मान्यता दिली आहे. कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचं अनुदान प्रति रुग्ण २ हजारांवरून ६ हजार रुपये करायलाही मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

July 29, 2025 4:02 PM July 29, 2025 4:02 PM

views 22

पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या अंतर्गत एकंदर १ हजार ९०२ पुरस्कार देण्यात येणार आहेत.    महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशीम इथं विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. पिंपरी-...

June 24, 2025 8:01 PM June 24, 2025 8:01 PM

views 16

शक्तिपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, आदिवासी शासकीय वसतीगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमधे वाढ

राज्य सरकारनं आदिवासी शासकीय वसतीगृहांमधल्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता तसंच आहार भत्त्यात वाढ करायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.    २०१७च्या महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमात सुधारणा करून, आगामी अधिवेशनात नवं विधेयक आणण्याचा निर्णयदेखील आजच्या बैठकीत झाला.    राज्यातल्या १८ तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या  शक्तिपीठ महामार्गालाही आजच्या बैठकीत मान्यता दिली...

June 3, 2025 8:18 PM June 3, 2025 8:18 PM

views 65

राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा आणि अनुषांगिक खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. केंद्रीय स्तरावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे असल्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणं आवश्यक आहे. त्यामुळे ५१ व्या जनजाती सल्लागार परिषदेत राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात...

May 20, 2025 8:37 PM May 20, 2025 8:37 PM

views 11

राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर

राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण आज जाहीर झालं असून त्यासाठी ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. ‘माझे घर माझा अधिकार’ या ब्रीदवाक्यासह हा कार्यक्रम राबवताना अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्या विशिष्ट गरजांचा धोरणात विचार केला आहे.   याशिवाय, महानगर गॅस लिमिटेडला  कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मुंबईत देवनार इथला भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करु...

May 6, 2025 7:21 PM May 6, 2025 7:21 PM

views 15

Cabinet Decision : तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता ५,५०३ कोटी रुपयांचा निधी

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता ५ हजार ५०३ कोटी रुपये निधीला या बैठकीत मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं. यात अष्टविनायक गणपतींच्या जिर्णोद्धारासाठी १४७ कोटी, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटी, जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी २५९ कोटी, त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यासाठी २७५ कोटी, महालक्ष्मी मंदिर १४४५ कोटी आणि माहूर गडासाठी ८२९ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. ...

April 15, 2025 6:55 PM April 15, 2025 6:55 PM

views 16

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यातील महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता आणि नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्याच्या नियमांमध्ये एकवाक्यता आणण्यात आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याकरिता नवीन दरांबाबत अधिसूचना काढायला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.    सुधारित नियमानुसार निवासी, शैक्षणिक, धर्मादाय तसंच सार्वजनिक वापरासाठीच्या मालमत्तांचा भाडेपट्टा दर हा रेडी रेकनरच्या तुलनेत अर्धा टक्के पेक्षा कमी अ...

February 25, 2025 9:17 PM February 25, 2025 9:17 PM

views 13

गावठाणांमधल्या अपूर्ण नागरी सुविधा पूर्ण करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

राज्यात १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या ३३२ गावठाणांमध्ये अपूर्ण राहिलेल्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या कामांसाठी ५९९ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करायलाही यावेळी मंजुरी देण्यात आली.    महाराष्ट्र राज्य आधारसामग्री, अर्थात डेटा धोरण आणि या धोरणाच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. शासनाच्या...

September 23, 2024 8:06 PM September 23, 2024 8:06 PM

views 8

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणं, आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करुन जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणं. या दृष्टीनं हे सांस्कृतिक धोरण तयार केलं आहे.  ऐतिहासिक ठिकाणं, कला संग्रहालयं आणि साहित्य यासारख्या सांस्कृतिक संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करणं,  सांस्कृतिक धोरण तयार करताना स्थानीय समुदाया...