October 15, 2024 8:14 PM October 15, 2024 8:14 PM

views 12

हिंसाचार होणार नसल्याची खबरदारी घेण्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सूचना

महाराष्ट्रात नजीकच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे कुठलाही हिंसाचार होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना पोलिसांना दिल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. निवडणूक काळात कुठलाही हिंसाचार, गैरप्रकार, पैशांची अवैध वाहतूक होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचं ते म्हणाले.   हरयाणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या बॅटरीच्या पातळीमधे अनियमितता झाल्याच्या २० तक्रारी काँग्रे...

October 15, 2024 6:43 PM October 15, 2024 6:43 PM

views 13

राज्यात आजपर्यंत ९ कोटी ६३ लाख मतदारांची नोंद

राज्यात आजपर्यंत नोंदणी झालेल्या ९ कोटी ६३ लाख मतदारांमध्ये ४ कोटी ९७ लाख पुरुष आणि ४ कोटी ६६ महिला आहेत. १ कोटी ८५ लाख हे २० ते २९ वयोगटातले मतदार आहेत. २० लाख ९३ हजार मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदारयादीत नाव नोंदवलं आहे. कातकरी, कोलम, मारिया गोंड या विशेषतः आदिवासी जमातींमधल्या सर्व २ लाख ७७ हजार मतदारांची नोंद मतदार यादीत केल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी इच्छुक पात्र नागरिकांना येत्या १९ तारखेपर्यंत अर्ज भरता येईल. 

October 15, 2024 8:43 PM October 15, 2024 8:43 PM

views 18

राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत निधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणूक अधिसूचना येत्या २२ तारखेला जारी होईल, २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला होईल, तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.  २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही याच वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे.  &nb...

October 15, 2024 3:39 PM October 15, 2024 3:39 PM

views 25

काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षकांची बैठक

काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षकांची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सह प्रभारी बी एम संदिप, यशोमती ठाकूर, उपस्थित होते.

October 1, 2024 3:55 PM October 1, 2024 3:55 PM

views 8

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातल्या भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतले भाजपचे मंत्री, आमदार, खासदार भाग घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं समजतं.