October 21, 2024 7:14 PM October 21, 2024 7:14 PM

views 7

विधानसभा निवडणुकांसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. डोंबिवलीत राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

October 20, 2024 8:03 AM October 20, 2024 8:03 AM

views 9

सरकार अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ – अखिलेश यादव

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्यानं महिलांना पैसे वाटप करण्याची वेळ या सरकारवर आल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. धुळे शहर मतदारसंघातून इर्शाद जहागीरदार यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आयोजित सभेत ते आज बोलत होते. महायुतीचं सरकार हे धर्मा धर्मात तेढ निर्माण करणारं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारं सरकार आहे, असा आरोपही यादव यांनी केला. महायुतीचं सरकार हटवून महाविकास आघाडीचं सरकार बनवण्याचं आवाहन यावेळी अखिलेश यादव यांनी केलं.  &...

October 19, 2024 7:18 PM October 19, 2024 7:18 PM

views 18

काँग्रेसच्या निरीक्षकांची टिळक भवन इथं बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निरीक्षकांची बैठक टिळक भवन इथं झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, भुपेश बघेल, पृथ्वीराज चव्हाण, चरणजीत सिंग चन्नी, जी. परमेश्वर, एम बी पाटील, उत्तम कुमार रेड्डी, टी एच सिंह देव उपस्थित आहेत.

October 19, 2024 7:25 PM October 19, 2024 7:25 PM

views 14

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत, येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल, असं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे, एकजुटीने भाजपाशी लढू आणि सरकार स्थापन करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.    त्याआधी चेन्निथला यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा के...

October 19, 2024 3:30 PM October 19, 2024 3:30 PM

views 16

विधानसभा निवडणुकीसाठी पात्र मतदारांना नाव नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस

विधानसभा निवडणुकीसाठी ज्या पात्र मतदारांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही त्यांना आजचा दिवस, संधी आहे. आज  रात्री १२ वाजेपर्यंत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं  जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवसांपूर्वी मतदार नोंदणी करता येते. मतदार नोंदणीचे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून...

October 19, 2024 3:02 PM October 19, 2024 3:02 PM

views 10

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती स्थापन

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. समितीचे निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली असून या समितीत राज्यातले विद्यमान मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

October 18, 2024 8:53 AM October 18, 2024 8:53 AM

views 9

भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड- देवळा विधानसभा मतदार संघातले भाजपाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा काल पत्रकार परिषदेत केली. या मतदारसंघात उमेदवारीसाठी आपले चुलतबंधू आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नावाची शिफारस डॉ आहेर यांनी पक्षाकडे केली आहे. भाजपचे डॉ. राहुल आहेर यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता.

October 16, 2024 7:31 PM October 16, 2024 7:31 PM

views 36

महाविकास आघाडीत २८८ पैकी २२४ जागांवर सहमती

महाविकास आघाडीत २८८ पैकी २२४ जागांवर सहमती झाली आहे. उद्या उर्वरित जागांवर सहमती होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नवी दिल्लीत पक्षाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आज ८४ जागांच्या उमेदवारांंबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

October 15, 2024 7:04 PM October 15, 2024 7:04 PM

views 17

राज्यातल्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सज्ज – रमेश चेन्नीथला

राज्यातल्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सज्ज असून आघाडी २८८ जागांवर लढणार आहे, असं काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.  राज्याच्या तिजोरीत पैसै नाहीत, निधीची तरतूद नसतानाही दोन महिन्यात युती सरकारने जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली. 

October 15, 2024 6:58 PM October 15, 2024 6:58 PM

views 8

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विचारात घेऊ – निवडणूक आयोग

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर दिशानिर्देश विचारात घेऊ, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज सांगितलं. निवडणूक आयोगाचं पथक मुंबई दौऱ्यावर असताना, रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.    शरद पवार यांनी ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह बाद करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र ही मागणी मंजूर केली नसल्याचं आयोगानं आज स्पष्ट केलं. त्या...