October 25, 2024 5:19 PM October 25, 2024 5:19 PM
14
राज्यात आचारसंहितेच्या काळात कारवाईत ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
राज्यात आचारसंहितेच्या काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत कालपर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आज पुण्यातून १३८ कोटी रुपयांचं सोनं जप्त केल्याचं वृत्त आहे. कालच्या एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. विधानसभा निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण...