November 10, 2024 7:03 PM November 10, 2024 7:03 PM

views 10

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणं हा महायुतीचा उद्देश – गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात शिगेला पोचला असून, आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा, रोड शो इत्यादींच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आज राज्यात प्रचारदौरा केला.    तत्त्वांसोबत तडजोड करत कसंही करून सत्तेत येणं हा महाविकास आघाडीचा एकमेव उद्देश आहे, तर शिवाजी महाराजांच्या तत्त्वांना अनुसरून  महाराष्ट्राला देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणं हा महायुतीचा उद्देश आहे, असं गृहमंत्री अमित शाह रावेर इथल्या प्रचारसभेत ...

November 8, 2024 6:53 PM November 8, 2024 6:53 PM

views 16

राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे – शरद पवार

राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे, देशात सध्या मोदी यांची हुकूमशाही सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. ते आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं प्रचारसभेत बोलत होते. महविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना दरमहा तीन हजार रुपये, बसचा मोफत प्रवास, जातनिहाय जनगणना करून ५०टक्के आरक्षणाची मर्यादा काढून आरक्षण, कृषी समृध्दी योजनेत ३ लाखांपर्यंत कर्ज माफी, बेरोजगार तरुणांना ४ हजार रुपये मदत हे निर्णय घेणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. 

November 7, 2024 6:13 PM November 7, 2024 6:13 PM

views 10

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १३ ते १८ नोव्हेंबर या काळात काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली  काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक आज झाली, त्यावेळी चेन्नीथला यांनी ही माहिती दिली.     पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १३ ते १८ नोव्हेंबर या काळात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. जेष्ठ नेते राहुल गांधींच्या सभा १२,१४ आणि १६ या तारखांना तर प्रियांका गांधींच्या सभा १३...

November 6, 2024 8:31 PM November 6, 2024 8:31 PM

views 19

काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध

महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा आज मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलात होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मविआचे इतर नेते सभेला उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. महिलांना दरमहा तीन हजार रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या महालक्ष्मी योजनेचा तसंच बेरोजगारांना ४००० रुपये अर्थसहाय्याचा त्यात समाव...

November 6, 2024 3:24 PM November 6, 2024 3:24 PM

views 9

पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू – उद्धव ठाकरे

आपलं सरकार आलं, तर शेतकऱ्यांचं नुकसान न करता तेल, डाळ, साखर, तांदूळ, गहू या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षं स्थिर ठेवून दाखवू, असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. रत्नागिरी जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रत्नागिरी इथं काल संध्याकाळी त्यांची सभा झाली. आपलं सरकार आलं, तर बारसू रिफायनरी प्रकल्प हद्दपार करू असं आश्वासनही त्यांनी या सभेत बोलताना दिलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण, ...

November 6, 2024 9:28 AM November 6, 2024 9:28 AM

views 10

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात त्याचं प्रकाशन होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी आज दुपारी न...

November 4, 2024 7:51 PM November 4, 2024 7:51 PM

views 7

मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी पाठवली नसल्यामुळे माघार घेत असल्याचं, त्यांनी आज सकाळी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बातमीदारांना सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.  दरम्यान, या निर्णयाशी आपला काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा शरद पवारांनी दिला.

October 25, 2024 7:19 PM October 25, 2024 7:19 PM

views 12

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची चौथी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात कसबा पेठेतून गणेश भोकरे, चिखलीतून गणेश बरबडे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अभिजीत राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय केजमधून रमेश गालफाडे आणि कलीना इथून संदीप हुटगी निवडणुकीच्या रिंगणात असतील.

October 25, 2024 7:15 PM October 25, 2024 7:15 PM

views 12

‘महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत, उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होणार’

महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नये, असं त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना बजावलं.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राज्यात सुमारे १३ ठिकाणी सभा होणार आहेत. सध्या मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड आणि धुळे ही ठिकाणं निश्चित झाली आहेत. उर्वरित लवकरच होतील, असं त्यांन...

October 25, 2024 7:11 PM October 25, 2024 7:11 PM

views 14

मविआत प्रत्येकी ९० आणि उर्वरित जागा मित्रपक्षांना दिल्याचं बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार आहेत. उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना दिल्या जातील, अशी माहिती काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज दिली.    राज्यात विधानसभा निवडणूक हरण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची मोडतोड करून या अफवा पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असंही ते य...