March 18, 2025 8:24 PM March 18, 2025 8:24 PM

views 7

देशाच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभाची नोंद होईल – प्रधानमंत्री

देशाच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभाची नोंद होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. लहानसहान सोयी सुविधांची पर्वा न करता कोट्यावधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते असं ते म्हणाले. अशा उत्सवांमुळे आपल्या परंपरा, आणि वारशाचं भव्य दर्शन जगाला मिळालं असं त्यांनी सांगितलं.   प्रयागराज इथल्या संगमातलं पाणी मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना आपण तिथल्या गंगा तलावात अर्पण केलं याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. महाकुंभापासून प्रेरणा घेऊन देशभरात नदी उ...

February 27, 2025 9:10 PM February 27, 2025 9:10 PM

views 11

महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असून देशाला त्याच्या हजारो वर्षाच्या परंपरेचा गर्व आहे. देश एका नव्या ऊर्जेसह पुढे जात आहे,  असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभाची सांगता झाल्यानंतर आज प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावना त्यांच्या समाजमाध्यमावरच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या. देशाचं नवं भविष्य लिहिण्याचा हा काळ आहे. महाकुंभाला आलेले कोट्यावधी लोक हा केवळ एक विक्रम नसून तो समृद्ध भारतीय परंपरेचा पाया आहे. येणाऱ्या शतकांमध्ये देशाची परंपरा आणि भारतीय संस्कृती अधिक सम...

February 27, 2025 1:05 PM February 27, 2025 1:05 PM

views 10

महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने १६ हजार रेल्वेगाड्या चालवल्या – रेल्वेमंत्री

प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने १६ हजार रेल्वेगाड्या चालवल्या. यात जवळपास साडेचार कोटी भाविकांनी प्रवास केल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते प्रयागराज जंक्शन इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. या सोहळ्याची तयारी रेल्वे मागच्या अडीच वर्षांपासून करत असून यासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं.  भाविकांना सुरळितपणे ये जा करता यावी यासाठी महाकुंभ मेळ्सासाठी २१ हून अधिक उड्डाणपूल आणि भुयार बांधले. जीआरपी, पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेच्या मदतीने या मेळ्याचं यशस...

February 27, 2025 9:53 AM February 27, 2025 9:53 AM

views 8

महाकुंभ मेळ्याची प्रयागराज इथं सांगता

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळा काल समाप्त झाला. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या महाकुंभामध्ये ६६ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. भारतीय वायु दलानं घाटांवर पुष्पवृष्टि करुन भाविकांना संस्मरणीय आनंद दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भाविक, संत आणि कल्पवासी यांना शुभेच्छा दिल्या.   भाविकांनी संपूर्ण जगाला राष्ट्रीय एकता आणि समर्पणाचा संदेश दिला असल्याचं ते म्हणाले. महाकुंभ २०२५ हा इतिहासातील अध्यात्मिकता आणि मानवी संमेलनाचं एक सर्वात मो...

February 26, 2025 1:33 PM February 26, 2025 1:33 PM

views 9

MahaKumbh 2025 : भाविकांसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय

महाकुंभ मेळाव्यासाठी प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज होत्या. भारतीय रेल्वेनं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था केली. आज सकाळी ९ वाजेपर्यंत प्रयागराज मधल्या विविध स्थानकांवरुन मिळून ११५ गाड्या रवाना झाल्या. या गाड्यांमधून सहा लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रवास केला असं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं.  आज दिवसभरात सुमारे साडेतीनशे गाड्या सोडण्यात येतील. काल ३१४ गाड्यांमधून १४ लाखापेक्षा जास्त भाविक रवाना झाले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष...

February 24, 2025 10:11 AM February 24, 2025 10:11 AM

views 10

महाकुंभ मेळ्यात ६२ कोटी ६ लाखांहून अधिक भाविकांचं पवित्र स्नान

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात दररोज जगभरातून लाखो भाविक हजेरी लावत असून त्रिवेणी संगमावर आतापर्यंत ६२ कोटी ६ लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. काल अनेक मान्यवरांसह सुमारे एक कोटी ३२ लाख भाविकांनी संगमात स्नान केले. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी, लोकसभेचे खासदार आणि भाजप नेते संबित पात्रा, गायक कैलाश खेर, चित्रपट निर्माते बोनी कपूर, शंकराचार्य भारतीतीर्थ महास्वामीजी यांनीही काल त्रिवेणी संगमावर स्नान केलं.

February 23, 2025 10:06 AM February 23, 2025 10:06 AM

views 4

महाकुंभमध्ये ६० कोटी ७४ लाखांहून अधिक भाविकांचं पवित्र स्नान

उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत 60 कोटी 74 लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. या भव्य मेळ्यात अजूनही दररोज लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांसारख्या अनेक नामवंत व्यक्तींसह काल दिवसभरात एकंदर 43 लाख लोकांनी पवित्र स्नान केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

February 22, 2025 10:35 AM February 22, 2025 10:35 AM

views 12

महाकुंभ मेळयाच्या सांगता समारंभाची जय्यत तयारी सुरू

येत्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणाऱ्या महाकुंभ मेळयाच्या सांगता समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी प्रयागराज इथे जाऊन महाकुंभ मेळयाच्या या शेवटच्या दिवसाच्या तयारीचा आढावा घेतला. आतापर्यंत 59 कोटी 19 लाखांहून अधिक भाविकांनी महाकुंभात पवित्र स्नान केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.

February 21, 2025 9:47 AM February 21, 2025 9:47 AM

views 6

कारागृहातील कैद्यांना महाकुंभच्या पवित्र पाण्याने स्नान करण्याची संधी

उत्तर प्रदेशातल्या विविध कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना आज त्यांच्या कारागृहाच्या आवारातच प्रयागराज महाकुंभाचं पवित्र स्नान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.   उत्तर प्रदेश सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत, प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमाचं पवित्र पाणी कारागृहाच्या आवारात आणलं जाईल. इच्छूक कैद्यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेनुसार या पाण्याने स्नान आणि पूजा करता येईल. सध्या उत्तर प्रदेशच्या तुरुंगात एकंदर ९० हजार कैदी आहेत.

February 21, 2025 9:37 AM February 21, 2025 9:37 AM

views 2

महाकुंभ मेळ्यातील प्रवासी वाहतुकीसाठी भारतीय रेल्वे सज्ज

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या आठवड्यात, प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं स्थानकाच्या बाहेर अतिरिक्त विशेष व्यवस्था तयार केली आहे.   प्रवाशांना त्यांच्या गाड्यांच्या सुटण्याच्या नियोजित वेळेनुसार स्थानकावर प्रवेश दिला जात आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गेल्या शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, भारतीय रेल्वेनं अनेक कडक उपाययोजना लागू केल्या...