February 17, 2025 9:40 AM

views 21

MahaKumbh 2025 : भाविकांसाठी उभारण्यात आलेलं सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श

प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल ४० हजार चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे. विविध सरकारी उपक्रम इथं कार्यान्वित करण्यात आल्यानं हे गाव उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील परिवर्तनाचं समग्र दर्शन घडविणारं ठरलं आहे. राज्य सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे बदललेल्या गावांचं दर्शन घडविणाऱ्या राज्याच्या यशोगाथेची झलक या प्रदर्शनात पर्यटकांना पाहायला मिळते. बांदा, झाशी, चित्रकूट, ललितपूर आणि महोबा यासह बुंदेलखंडातील ...

February 14, 2025 8:20 PM

views 16

महाकुंभ मेळ्याला ५० कोटी भाविकांची भेट

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी ५० कोटी ४ लाख भाविकांनी भेट दिली आहे. जगातल्या कुठल्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक सोहळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले नाही, असं उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलं आहे. कित्येक बड्या देशांची लोकसंख्या यापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज कुटुंबासह प्रयागराज इथं पवित्र स्नान केलं. 

February 13, 2025 8:11 PM

views 27

अफवा आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई

प्रयागराजमध्ये महाकुंभाबाबत अफवा, चुकीची माहिती, खोट्या आणि जुन्या बातम्या पसरवणाऱ्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचं उत्तरप्रदेश पोलिसांनी सांगितलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याबरोबरच समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे तसचं नागरिकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये आणि कोणत्याही संशयास्पद पोस्टची माहिती द्यावी असं आवाहनही केलं आहे.

February 13, 2025 2:29 PM

views 19

MahaKumbh 2025 : माघ पौर्णिमेनिमित्त २ कोटींहून अधिक भाविकांचं पवित्र स्नान

प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात काल दोन कोटींहून अधिक भाविकांनी माघ पौर्णिमेनिमित्त स्नान केलं. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. 13 जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 46 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं आहे.

February 12, 2025 9:43 AM

views 18

MahaKumbh : माघ पौर्णिमा स्नानासाठी भाविकांची गर्दी

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आज माघ पौर्णिमा स्नान सुरू आहे. या वर्षी 10 लाखांहून अधिक कल्पवासी भाविक यामध्ये सहभागी होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जाणारा महाकुंभ 13 जानेवारीपासून सुरू झाला. आतापर्यंत 46 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं आहे.

February 10, 2025 7:13 PM

views 24

Mahakumbh 2025 : मध्यरेल्वे १६ गाड्या चालवत असून परिस्थिती सुरळीत

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्यरेल्वे १६ गाड्या चालवत असून या सर्व स्थानकांवरची परिस्थिती सुरळीत आहे. यासंदर्भात कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केलं आहे. राज्यातून दररोज सुमारे २० विशेष आणि नियमित गाड्या प्रयागराज आणि त्या भागासाठी चालवल्या जात आहेत. इथल्या रेल्वेस्थानकांवर प्रशासनाचं बारीक लक्ष असून गर्दी जास्त वाढल्यास तिथून तातडीनं अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडल्या जात...

January 20, 2025 1:51 PM

views 18

महाकुंभ मेळ्यात भाविकांना आरोग्यदायी अन्न मिळण्यासाठी विविध उपाययोजना

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये लाखो भाविकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळावं यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. महाकुंभ क्षेत्रात अन्न विश्लेषकांसह १० फिरत्या अन्न चाचणी प्रयोगशाळा तैनात करण्यात आल्या असून त्यात हॉटेल्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांच्या छोट्या स्टॉलच्या खाद्यपदार्थांची भेसळ आणि गुणवत्ते संदर्भात तपासणी केली जात आहे. हा मेळावा ५ झोन आणि २५ सेक्टरमध्ये विभागण्यात आला असून स्वच्छता आणि सुरक्षा मानकांवर नियमित लक्ष ठेवण...

January 16, 2025 8:46 PM

views 17

महाकुंभात १० देशांमधून आलेल्या एकूण २१ सदस्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केलं

प्रयागराज मध्ये सुरु असलेल्या महाकुंभात आज १० देशांमधून आलेल्या एकूण २१ सदस्यांनी त्रिवेणी संगमात डुबकी मारली. त्यांनी हेलिकॉप्टर मधूनही महाकुंभाच्या गर्दीचं दर्शन घेतलं. या शिष्टमंडळाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आमंत्रित केलं होतं. या शिष्टमंडळात फिजी, फिनलंड, गयाना, मलेशिया मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसचं संयुक्त अरब अमिरातीच्या नागरिकांचा समावेश आहे. 

January 15, 2025 8:26 PM

views 8

महाकुंभ : दहा देशांचे २१ प्रतिनिधी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार

उत्तरप्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यानं जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जगभरातल्या दहा देशांचे २१ प्रतिनिधी उद्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आमंत्रणावरून हे प्रतिनिधी आज भारतात पोहोचले. अरैल इथं सर्व प्रतिनिधींची राहण्याची सोय करण्यात आली आहे. उद्या स्नान केल्यानंतर ते महाकुंभ मेळ्यात जातील. फिजी, फिनलँड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅको तसंच संयुक्त अरब अमिराती या देशातून हे प्रतिनिध...

January 8, 2025 2:59 PM

views 13

महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी इलेक्ट्रिकच्या बसगाड्यांची सोय

उत्तरप्रदेश राज्यातल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी, उत्तरप्रदेश राज्यमार्ग परिवहन महामंडळा कडून इलेक्ट्रिकच्या बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.   येत्या १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या महाकुंभ दरम्यान होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, सुयोग्य नियोजन करण्यासाठी ग्रामीण भागातल्या वाहतुकीसाठी सुमारे सात हजार बसगाड्या आणि शहरातल्या वाहतुकीसाठी साडेतीनशे बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे.   महाकुंभ मेळ्याच्या संगम सोहळा परिसराच्य...