October 20, 2025 3:01 PM October 20, 2025 3:01 PM

views 51

कोकण रेल्वेच्या ४ गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीला थांबा

रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या ४ गाड्यांपैकी २ गाड्यांना  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग इथं तर २ गाड्यांना कणकवली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. याबाबत रेल्वे बोर्डानं परिपत्रकही जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस तसंच  एर्नाकुलम - अजमेर मरुसागर एक्सप्रेस या गाड्या सिंधुदुर्ग स्थानकावर तर हिसार - कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधीधाम - नागरकोइल एक्सप्रेस या दोन गाड्या कणकवली  स्थानकावर थांबणार आ...

October 16, 2025 3:01 PM October 16, 2025 3:01 PM

views 64

कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भरतीचा प्रस्ताव

कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भर्तीसाठी रेल्वे मंत्रालयाला अर्ज करण्यात आला असून येत्या एक ते दोन महिन्यात त्याबद्दल अनुमोदन मिळण्याची शक्यता असल्याचं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे. ते काल कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या पस्तिसाव्या स्थापना दिनानिमित्त वाशी इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   स्थानिक पदभरती प्रक्रिया राबवली जात असून येत्या २७ ऑक्टोबर रोजी ७९ जागांसाठी परीक्षा होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. कोकण रेल्वेला कर्जाची परतफेड करण्यासाठी ७ हजार ७७६ को...

July 19, 2024 8:07 PM July 19, 2024 8:07 PM

views 7

कोकणात गणपतीक जाऊचा? रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ, तसंच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्ही बाजूंनी या विशेष गाड्यांच्या फेऱ्या होतील, असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.           

July 10, 2024 1:37 PM July 10, 2024 1:37 PM

views 13

अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

गोव्यातल्या पेडणे इथं अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसंच, मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगावहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस या गाड्याही आज रद्द झाल्या आहेत.    काल सुटलेली हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक...

June 20, 2024 7:30 PM June 20, 2024 7:30 PM

views 13

कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

कोकण रेल्वे मार्गाच्या टप्प्याटप्प्यानं दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. गेल्या ३ वर्षात ५० किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. मडगांव ते ठोकर आणि कणकवली ते सावंतवाडी या दरम्यान दुहेरीकणासाठी प्रस्ताव आहे. तसंच पेरनेम आणि गोवा या दोन बोगद्यांचे नूतनीकरण करण्याची कोकण रेल्वेची इच्छा असल्याचे झा यांनी सांगितलं.