November 16, 2025 2:38 PM November 16, 2025 2:38 PM

views 14

जम्मू-काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातून सुरक्षा दलांक़डुन‘सुधारित विस्फोटक उपकरण’ जप्त

जम्मू-काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातून सुरक्षा दलांनी काल I.E.D, म्हणजेच ‘सुधारित विस्फोटक उपकरण’ जप्त केलं. या उपकरणाचा नियंत्रित स्फोट करून ते निकामी करण्यात आलं. या स्फोटामुळे थाना मंडी भागातल्या अप्पर बंगई गावातल्या एका घराचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

September 8, 2025 1:25 PM September 8, 2025 1:25 PM

views 24

जम्मू-काश्मीर: सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   कुलगाम जिल्ह्यातल्या गुड्डर परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती, दहशतवाद्यांच्या ठिकाणापर्यंत सुरक्षा दलाचे जवान पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं.

August 9, 2025 3:23 PM August 9, 2025 3:23 PM

जम्मू-काश्मीरमधे लष्करी कारवाईदरम्यान एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान आज सकाळी एका दहशतवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.    या परिसरात ८ दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरुन शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

July 19, 2025 6:16 PM July 19, 2025 6:16 PM

views 37

काश्मिर विभागात १० ठिकाणी छापे, दहाजणं ताब्यात

जम्मू-काश्मिर पोलिसांच्या गुप्तचर विभागानं काश्मिर विभागात १० ठिकाणी छापे टाकले आणि १० जणांना ताब्यात घेतलं. हे सर्वजण इनक्रिप्टेटेड मेसेजिंग अॅपचा वापर करुन संदेशांची देवाणघेवाण करत होते. पाकिस्तानस्थित जैश-ए-महम्मद आणि लष्कर - ए- तयब्बाच्या दहशतवाद्यांशी त्यांचा संपर्क होता, असाही संशय आहे. यावेळी काही कागदपत्र आणि उपकरणंही ताब्यात घेण्यात आली. 

June 7, 2025 11:25 AM June 7, 2025 11:25 AM

views 31

जम्मूकाश्मिरमधील विकास प्रकल्पांमुळे राज्याला नवी गती मिळेल- प्रधानमंत्री

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेले विकास प्रकल्प राज्याच्या विकासाला नवीन गती देतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. जम्मू आणि कश्मीरमध्ये 46 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.   यावेळी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्र्यांनी केलं. तसंच या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या, जगातल्या सर्वात उंचीवरच्या चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटनही त्यांनी केलं. देशातला सर्वात ...

May 4, 2025 8:08 PM May 4, 2025 8:08 PM

views 6

J & K : लष्कराचा ट्रक दरीत कोसळून ३ जवानांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यात बॅटरी चष्मा इथं आज लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरून ७०० फुट खोल दरीत कोसळल्यानं लष्कराच्या ३ जवानांचा मृत्यू झाला. लष्कराचा हा ट्रक राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून जम्मूहून श्रीनगरला जात होता. ट्रक सुरू करताना वाहन चालकाचं  नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच लष्कर, पोलीस, राज्य आपत्ती निवारलगेच आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी बचाव कार्य सुरू केलं

April 30, 2025 1:33 PM April 30, 2025 1:33 PM

views 4

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर

जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर काल रात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरच्या समोरच्या भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. तसंच पाकिस्तानी सैन्यानं बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यातल्याही गोळीबार केला. भारतीय सैन्याने याला चोख प्रत्युत्तर दिलं. 

April 28, 2025 1:22 PM April 28, 2025 1:22 PM

views 33

पहलगाम हल्ल्याच्या निषेधासाठी जम्मू काश्मीर विधानसभेचं आज विशेष अधिवेशन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन आज भरलं आहे. कामकाज सुरु करण्यापूर्वी सभागृहाने या हल्ल्यात मरण पावलेल्यांना दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहिली. अध्यक्ष अब्दुल रहीम राथर यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी निषेधाचा ठराव मांडला असून त्यावर चर्चा सुरु आहे.   या भयानक हल्ल्यानंतर विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने केली होती. त्यानुसार नायब राज्यपाल मनोज सिन...

April 28, 2025 12:56 PM April 28, 2025 12:56 PM

views 13

पाकिस्तानी सैन्यानं काल रात्री केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या भागात पाकिस्तानी सैन्यानं काल रात्री केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. कुपवाडा आणि पूंछ भागातील नियंत्रण रेषेवर असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांमधून रात्री अचानक गोळीबार सुरू करण्यात आला. त्याला भारतीय सैनिकांनी तत्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितलं.

April 28, 2025 11:05 AM April 28, 2025 11:05 AM

views 47

दहशतवाद निर्णायक लढाईला पूर्ण पाठिंबा देणार – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री

दहशतवाद आणि त्याचं मूळ यांचा बिमोड करण्यासाठीच्या निर्णायक लढाईला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. तथापि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निरपराध लोकांचा बळी गेल्याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांना परकेपणा वाटेल अशा कोणत्याही स्वरुपाची अस्थानी कारवाई होऊ नये अशी चिंताही त्यांनी वक्तव्य केली आहे.   २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची यंत्रणा उखडून टाकण्यासाठी सक्रिय दहशतवादी आणि त्यांच्या भूमीगत ...