जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेले विकास प्रकल्प राज्याच्या विकासाला नवीन गती देतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. जम्मू आणि कश्मीरमध्ये 46 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्र्यांनी केलं. तसंच या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या, जगातल्या सर्वात उंचीवरच्या चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटनही त्यांनी केलं. देशातला सर्वात उंचावरचा केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते झालं. चिनाब आणि अंजी हे पूल जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीचं प्रवेशद्वार होतील असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.