May 4, 2025 8:44 PM May 4, 2025 8:44 PM

views 8

IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर निसटता विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सवर एका धावेनं विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. आंद्रे रसेलनं २५ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. त्याच्या या तडाखेबंद खेळीत चार चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता.    या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला २० षटकात ८ गडी गमावून २०५ धावाच करता आल्या. शेवटच्या चेंडूवर  जोफ्रा आर्च...

May 4, 2025 2:47 PM May 4, 2025 2:47 PM

views 22

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना कोलकाता इथे दुपारी साडेतीनला सुरु  होणार असून पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातला सामना  धर्मशाला इथं संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे.   चेन्नईत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दोन धावांनी पराभव केला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ १६ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

May 3, 2025 1:45 PM May 3, 2025 1:45 PM

views 5

IPL: क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडे सात वाजता खेळ सुरू होईल.   अहमदाबाद इथं काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं निर्धारित २० षटकांत सहा गडी गमावून २२४ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत ६ बाद १८६ करता आल्या.

April 29, 2025 1:41 PM April 29, 2025 1:41 PM

views 18

IPL: आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स चा सामना

आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना दिल्लीत रंगणार आहे. सामना संध्याकाळी साडेसातला सुरु होईल.   काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटनच्या २०९ धावांना प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सने २५ चेंडू राखत हे आव्हान पार केलं.   अवघ्या १४ वर्ष वयाच्या  वैभव सूर्यवंशीने ३८ चेंडूत १०१ धावा फटकावत सर्वात कमी वयात वेगवान शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला.  वैभवने आपल्या या तडाखेबंद खेळीत सात चौकार...

April 28, 2025 1:01 PM April 28, 2025 1:01 PM

views 6

IPL: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज लढत

आयपीएल क्रिकेटमध्ये आज जयपूरमधे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे.   मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या कालच्या सामन्यात  मुंबई इंडियन्स संघानं लखनौ सुपर जायंट्स संघावर ५४ धावांनी मात केली. मुंबई इंडियन्स संघानं ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघ १६१ धावाच करू शकला.   कालच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघानं दिलेलं १६३ धावांचं आव्हान रॉयल चॅलें...

April 26, 2025 1:33 PM April 26, 2025 1:33 PM

views 11

IPL: आज संध्याकाळी कलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना

आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये कलकत्ता इथल्या इडन गार्डन मैदानावर सामना रंगणार आहे.   चेन्नई इथं काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद या संघानं यजमान चेन्नई सुपर किंग्स संघाला ५ गडी राखून पराभूत केलं. चिदंबरम स्टेडिअमवर हा सामना पार पडला. सनराईजर्स हैदराबाद संघानं १८ षटक आणि चार चेंडूत १५५ धावांचं लक्ष गाठलं. ईशान किशनने ३४ चेंडूत ४४ धावा करत तर हर्षल पटेल ने ४ गडी बाद करत संघाच्या विजायमध्ये मोठा वाटा उचलला.

April 24, 2025 2:04 PM April 24, 2025 2:04 PM

views 17

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना BCCI ची श्रद्धांजली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कालच्या सामन्यादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. तसंच खेळाडू, समालोचक आणि इतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरूमधे रायल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना होणार आहे. सामना ७.३० वाजता सुरु होईल.

April 23, 2025 11:07 AM April 23, 2025 11:07 AM

views 7

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स संघाचा लखनौ सुपर जायंट्स संघावर ८ गडी राखून विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं झालेल्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्स संघाने ६ गडी बाद १५९ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देत, दिल्ली कॅपिटल संघाने २ गडी बाद १६१ धावा फटकावत सामना जिंकला.

April 22, 2025 2:24 PM April 22, 2025 2:24 PM

views 8

IPL: आज लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान लखनऊ इथं सामना होणार आहे.  संध्याकाळी  साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.    दरम्यान, काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ३९ धावांनी पराभव केला. गुजरातनं १९९ धावांचं लक्ष्य दिलं होतं, परंतु कोलकाताचा संघ १५९ धावाच करू शकला.  गुजरातचा हा सहावा विजय आहे.

April 13, 2025 7:12 PM April 13, 2025 7:12 PM

views 8

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखत विजय मिळवला. बेंगळुरुनं १७ षटक आणि ३ चेंडूत १७५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीनं ४५ चेंडूत ६२ धावा केल्या. टी-२० कारकीर्दीतलं हे त्याचं १०० वं अर्धशतक आहे.