डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 4, 2025 8:44 PM | IPL 2025

printer

IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर निसटता विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सवर एका धावेनं विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. आंद्रे रसेलनं २५ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. त्याच्या या तडाखेबंद खेळीत चार चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. 

 

या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला २० षटकात ८ गडी गमावून २०५ धावाच करता आल्या. शेवटच्या चेंडूवर  जोफ्रा आर्चर धावबाद झाल्यानं त्यांना बरोबरीची संधी गमवावी लागली. 

 

या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरु आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा