May 6, 2025 3:24 PM May 6, 2025 3:24 PM

views 11

भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज

भारताच्या जीडीपीमधे चालू वर्षात वाढ होऊन तो ४,१८७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे.  भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीने वर्तवली आहे.   जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं यंदाही राखलं असून आगामी २ वर्षात वाढीचा दर ६ दशांश टक्के राहील. २०२८मधे भारताचा जीडीपी ५ हजार ५८४ अब्ज डॉलर्सहून जास्त होण्याची शक्यता असून तेव्हा जर्मनीला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था...

April 23, 2025 8:24 PM April 23, 2025 8:24 PM

views 5

जागतिक विकास दरात घट होण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास आपल्या सर्व व्यापारी भागीदार देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावल्यानंतर, सुरू झालेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक विकास दरात सार्वत्रिक घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक अर्थव्यवस्थेबद्दलचा आपला ताजा अहवाल नुकताच जारी केला. अमेरिकेला मंदीच्या वाढता धोका असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यासोबतच, चीन, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या प्रमुख देशांसोबतच जी ७ सदस्य राष्ट्रांचा व...