डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज

भारताच्या जीडीपीमधे चालू वर्षात वाढ होऊन तो ४,१८७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे.  भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीने वर्तवली आहे.

 

जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं यंदाही राखलं असून आगामी २ वर्षात वाढीचा दर ६ दशांश टक्के राहील. २०२८मधे भारताचा जीडीपी ५ हजार ५८४ अब्ज डॉलर्सहून जास्त होण्याची शक्यता असून तेव्हा जर्मनीला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. जर्मनीचा वाढीचा दर यंदा शून्य टक्के राहील तर पुढच्या वर्षी २०२६मधे तो ९ दशांश टक्के राहील असा अंदाज आहे.

 

जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची असून तिथं जीडीपी ३० हजार ५०७ पर्यंत पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून त्यांचा जीडीपी १९ हजार २३१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा