June 5, 2025 7:08 PM June 5, 2025 7:08 PM

views 3

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात आज झालेल्या सामन्यात भारताची चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. त्यांनी डेन्मार्कच्या रासमुस केजर आणि फ्रेडरिक सोगार्ड या जोडीचा १६-२१, २१-१८,२२-२० असा पराभव केला.   दरम्यान, भारताच्या पी.व्ही. सिंधू हिला थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगकडून २२-२०,१०-२१,१८-२१ असा पराभव पत्करावा लागला. तर महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा मयू मात्सुमोतो आणि युकी फुकुशिया या जापानी जोडीन...

June 3, 2025 1:26 PM June 3, 2025 1:26 PM

views 10

Indonesia Open Badminton : भारताच्या पी व्ही सिंधूचा द्वितीय फेरीत प्रवेश

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं जपानच्या नोझोनी ओकुहराला नमवून द्वितीय फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं ओकुहराचा२२-२०, २१-२३, २१-१५ असा पराभव केला. पुरुष एकेरीत मात्र चीनच्या शी यु की कडून पराभूत झाल्यानं भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान संपुष्टात आलं. या स्पर्धेत आज  पुरुष एकेरीत एच एस प्रणाॅय तर पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचे सामने होणार आहेत.