November 27, 2025 1:15 PM November 27, 2025 1:15 PM

views 36

भारताची अर्थव्यवस्था ६.६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६ पूर्णांक ६ दशांश टक्क्यानी वाढण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. जीएसटी सुधारणांमुळे अमेरिकेने लादलेल्या आयात कराच्या प्रतिकूल परिणामापासून देशाची अर्थव्यवस्था वाचण्याची शक्यता आहे, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन ७ पूर्णांक ८ दशांश टक्के इतकं होतं.  तसंच मागील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ ६ पूर्णांक ५ दशांश टक्के नोंदवण्यात आली होती. या वर्षात त्यात वाढ होण्याच...

May 6, 2025 3:24 PM May 6, 2025 3:24 PM

views 11

भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज

भारताच्या जीडीपीमधे चालू वर्षात वाढ होऊन तो ४,१८७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे.  भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीने वर्तवली आहे.   जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं यंदाही राखलं असून आगामी २ वर्षात वाढीचा दर ६ दशांश टक्के राहील. २०२८मधे भारताचा जीडीपी ५ हजार ५८४ अब्ज डॉलर्सहून जास्त होण्याची शक्यता असून तेव्हा जर्मनीला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था...

April 17, 2025 1:47 PM April 17, 2025 1:47 PM

views 9

चालू वर्षात भारताची अर्थव्यवस्था साडेसहा टक्के दरानं वाढणार असल्याचा युएनसीटीएडीचा अहवाल

जगभरात मंदीचं सावट असतानाही या वर्षात भारताची अर्थव्यवस्था मात्र साडेसहा टक्के दराने वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकास अहवालात म्हटलं आहे. विकासाला चालना देणारा खर्च आणि वित्तीय धोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठं पाठबळ मिळत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. याच काळात चीनची अर्थव्यवस्था ४ पूर्णांक ४ दशांश टक्के दराने वाढत असून अमेरिकेची आणि युरोपियन महासंघाची अर्थव्यवस्था १ टक्के दराने वाढत आहे. फ्रांस , जर्मनी आणि इटली च्या अर्थव्यवस्था एका टक्क्याहून कमी दराने वाढत अस...