May 10, 2025 4:01 PM May 10, 2025 4:01 PM
4
युद्धस्थितीत पाकिस्तान जाणूनबुजून अफवांचा आधार घेत असल्याचा भारताचा आरोप
पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्तान डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत आहे. समाजमाध्यमावर बनावट प्रतिमा, चित्रफिती प्रसृत करत पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीनं त्यांच्या देशात दहशतवादाला खतपाणी घालत आहे, त्याच पद्धतीनं डिजिटल व्यासपीठावर बनावट बातम्या पसरवत आहे. भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळं नैराश्यानं ग्रासलेला पाकिस्तान खोट्या बातम्यांचा प्रसार करत जनतेची, माध्यमांची दिशाभूल करत आहे. भारतीय सैनिकांना पकडल्याचे किंवा भ...