June 4, 2025 7:04 PM June 4, 2025 7:04 PM

views 3

मिरज कॉर्ड लाईनला रेल्वेमंत्रालयाची मंजुरी

मध्य रेल्वेच्या मिरज या मुख्य स्थानकाची रेल्वे कनेक्टिव्हीटी आणि मालवाहतूक यामध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा मिरज कॉर्ड लाईनला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. १२८ कोटी ७८ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत  १ पूर्णांक ७३ किलोमीटर च्या मिरज कॉर्ड लाईन बरोबरच मल्टीट्रॅकिंग, उड्डाणपूल तसंच बायपास लाईन क्षमतेत वाढ अशी अनेक कामे केली जातील.    कुर्डूवाडी किंवा हुबळीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या तांत्रिक कारणांसाठी मिरज जंक्शनजवळ  एक ते दोन तास थांबतात...