June 28, 2024 8:00 PM
27
एफएटीएफच्या मूल्यमापन अहवालात भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीत स्थान
मनीलाँड्रिंग आणि दहशतवादाला पैसा पुरवणं यामुळे तयार होणारे धोके टाळण्यासाठी भारतानं केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत एफएटीएफ अर्थात फायनान्सिअल ॲक्शन टास्क फोर्सनं आपल्या परस्पर मूल्यमापन अहवालात भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीत स्थान दिलं आहे. या कृती गटाच्या सिंगापूर इथं झालेल्या दोन दिवसीय बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला. आज या बैठकीचा समारोप झाला. जी २० देशांपैकी फक्त इतर चार देशांना हा मान मिळाला आहे. रोखीनं होणारे व्यवहार ते डिजिटल अर्थव्यवस्थेकडे होणारं स्थित्यंतर तसंच जनधन, आधार...