July 2, 2024 1:21 PM

views 27

टी ट्वेंटी : भारताच्या पुरुष संघाची पाच सामन्यांची मालिका झिम्बाब्वे येथे रंगणार

भारताचा पुरुष क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान हरारे इथं ही मालिका होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतानं आपला १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून शुभमन गिल याचं नेतृत्व करणार आहे. ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू या संघाचा भाग असतील. या दौऱ्यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून जातील, मात्र नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती श्रीलंकेसोबतच्या मालिकेवेळी केली जाईल अशी माहिती बीसीसीआयचे सचि...

July 1, 2024 3:49 PM

views 34

विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर ३० रुपयांनी कमी

भारतीय तेल कंपन्यांनी विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर ३० रुपयांनी कमी केले आहेत. नवीन दर आजपासूनच लागू झाले असून, सुधारित दरांनुसार १९ किलोग्रॅमचा सिलेंडर दिल्लीत १ हजार ६४६ रुपयांना तर मुंबईत १ हजार ५९८ रुपयांना मिळतील. गेल्या महिन्यातही सिलेंडरच्या दरात ६९ रुपये ५० पैसे घट करण्यात आली होती.  

July 1, 2024 8:06 PM

views 171

३ नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांची जागा घेणारे हे कायदे संसदेने मागच्या वर्षी संमत केले होते. हे तीन नवे कायदे लागू करण्यापूर्वी सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांशी केंद्र सरकारनं अनेकदा चर्चा केली आहे. त्यामुळे देशभरातली राज्य सरकारं हे कायदे अंमलात आणण्यासाठी सज्ज आहेत. या फौजदारी कायद्यांचा उद्देश शिक्षा देणं नसून न्याय देणं आहे, असं सरकारनं म्हटलं आहे. त्यामु...

June 30, 2024 8:41 PM

views 32

क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यानं आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. समाज माध्यमावरच्या संदेशातून जडेजानं ही घोषणा केली. फेब्रुवारी २००९मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून जडेजानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं टी २०मध्ये एकूण ७४ सामन्यात ५१५ धावा केल्या असून गोलंदाजीत ७४ बळीही घेतले आहेत.  

June 30, 2024 7:58 PM

views 16

राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा : महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत ज्योती याराजीला सुवर्णपदक

राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत ज्योती याराजी हिनं आज महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं. हरयाणामधे पंचकुला इथं झालेल्या या स्पर्धेत ज्योतीनं १३ मिनिटं ६ सेकंदांत अंतर पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावलं. पुरुषांच्या ११० मीटर अडथळा स्पर्धेत तेजस शिर्से याने १३ मिनिटे ५४ सेकेंदांत अंतर पार करून सुवर्णपदक मिळवलं. हे दोन्हीही खेळाडू जागतिक क्रमवारीनुसार पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील.

June 29, 2024 7:41 PM

views 30

भारत ठरला महिला कसोटी क्रिकेटमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला संघ

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४ बाद २३६ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका अजूनही ३६७ धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज सकाळच्या पहिल्या सत्रातच भारतानं आपला पहिला डाव कालच्या ४ बाद ५२५ धावांवरून पुढे सुरु केल्यानंतर विक्रमी ६ बाद ६०३ धावांवर घोषित केला. ही महिला कसोटी क्रिकेटमधील आजवरची सर्वोच्च सांघिक धावसंख्या असून, भारत महिला कसोटी क्रिकेटमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला संघ ठरल...

June 29, 2024 3:39 PM

views 40

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्या वक्तव्याचा भारतातल्या विविध धर्मांच्या धर्मगुरूंकडून तीव्र निषेध

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्या वक्तव्याचा भारतातल्या विविध धर्मांच्या धर्मगुरूंनी तीव्र निषेध केला आहे. भारतात द्वेषपूर्ण भाषण आणि धर्मांतरविरोधी कायद्यातली वाढ चिंताजनक असल्याचं ब्लिंकेन यांनी म्हटलं होतं. अखिल भारतीय सूफी सज्‍जादानशीन परिषदेचे अध्‍यक्ष आणि अजमेर दर्ग्याच्या अध्यात्मिक गुरूंचे उत्तराधिकारी सैय्यद नसीरुद्दीन चिस्‍ती यांनी अमेरिकी अहवाल चुकीचा आणि बनावट असल्याचं म्हटलं आहे. अजमेरच्या चिश्ती फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी हा अहवाल फेटा...

June 29, 2024 3:11 PM

views 35

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य २०२३’ हा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचं सांगत भारतानं फेटाळला

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य २०२३’ हा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचं सांगत भारतानं तो फेटाळला आहे. भारतातील सामाजिक रचनेविषयीचं अज्ञान या अहवालातून दिसून येत असून तो मतपेढीनं प्रेरित आणि पूर्वग्रहदूषित असल्याचं दिसत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. एकतर्फी आणि पक्षपाती स्रोत, निवडक विशिष्ट घटना यावर अहवाल बेतलेला असल्याचं ते म्हणाले. या अहवालात देशातील काही ...

June 29, 2024 10:34 AM

views 35

देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली याराज्यांमधे मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल,झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आणि उत्तराखंडच्या काही भागातहीमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.   कोकण, मध्य महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह अन्य काही राज्यात मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. गुजरात,कर्नाटकची किनारपट्टी तसंच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही काही ...

June 28, 2024 8:14 PM

views 14

भारत आणि टोगो या राष्ट्रांमध्ये उच्चस्तरीय बैठक

भारत आणि टोगो या दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेल्या संबंधांचा आढावा घेण्यासाठी लोम इथे काल आणि आज उच्चस्तरीय बैठक झाली  आणि ते भविष्यात आणखी दृढ कसे होतील यावर चर्चा करण्यात आली. सामायिक स्वारस्याच्या क्षेत्रीय आणि जागतिक विषयांवर दोन्ही राष्ट्रांनी आपली मतं मांडली. १९६० साली टोगो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतानं त्यांना मान्यता दिली आहे.