July 28, 2024 2:29 PM July 28, 2024 2:29 PM
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात मनू भाकरची आज लढत
पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत गाजवला. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत मनू भाकर हिनं तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. ही फेरी आज रंगणार आहे. पुरुष हॉकी संघानं ब गटाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात करून विजयी सलामी दिली. भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही उत्तम सुरुवात केली. दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांनी, तर एकेरीत लक्ष्य सेन यानं पुढची फेरी गाठली. टेबल टेसिनच्या पुरुष एकेरीच्या प्राथमिक फेरीत...