July 26, 2024 7:52 PM

views 18

भारतानं आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं अध्यक्षपद स्वीकारलं

ADPC अर्थात आशियाई आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं अध्यक्षपद भारतानं काल स्वीकारलं. थायलंडमध्ये बँकॉक इथं भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आस्थापनेचे राजेंद्र सिंग यांनी चीनकडून या वर्षासाठीचं अध्यक्षपद स्वीकारलं. ADPC ही आशिया आणि पॅसिफिक प्रदेशांमधल्या देशांनी हवामानाशी संबधित संकटांना तोंंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संस्था आहे. भारतासह बांगलादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपाईन्स, श्रीलंका आणि थायलंड हे देश संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.

July 26, 2024 6:10 PM

views 27

ऑलिम्पिकच्या मैदानातले भारताचे शिलेदार

क्रीडाविश्वाचा मुकुटमणी मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या, पॅरिस इथं होणाऱ्या दिमाखदार सोहळ्याकडे जितके आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत, तितकीच आपली नजर या स्पर्धेच्या वेळापत्रकावरही आहे, हे जाणून घेण्यासाठी, की आपले शिलेदार नेमके कधी मैदानात उतरणार आहेत. या सगळ्या शिलेदारांची तोंडओळख आपण करून घेऊया.    एकंदर ११७ क्रीडापटूंचा हा चमू यंदा भारतासाठी पदक मिळवण्यासाठी लढत देणार आहे. १६ विविध क्रीडाप्रकारांच्या ६९ उपप्रकारांमध्ये ९५ पदकांच्या शर्यतीत ते उतरतील. यात ७० पुरुष आणि ४७ महिलांचा समा...

July 26, 2024 5:21 PM

views 21

गोष्ट भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची…

२०२४ हे वर्ष सुरू झाल्यापासूनच सगळ्यांना ज्याचे वेध लागले होते, त्या, क्रीडाविश्वात सगळ्यात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पॅरिसमध्ये रंगणार आहे. भारताकडून ११७ क्रीडापटूंचा चमू या स्पर्धेत सहभागी झाला आहे आणि हे क्रीडापटू ६९ विविध स्पर्धांमध्ये पदकाच्या शर्यतीत उतरणार आहेत. यंदा कोणाकोणाला पदकांनी गौरवलं जाणार, देशाचा तिरंगा कोणकोण उंचावणार, कोणकोण नवा इतिहास रचणार, या सगळ्याची उत्सुकता आपल्या मनात आहेच, संपूर्ण देशाच्या कोट्यवधी शुभेच्छा या क्रीडापटूंस...

July 20, 2024 7:56 PM

views 29

भारतात कोरोना महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन

भारतात २०२० मध्ये कोविड -१९ महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ या नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नियतकालिकात प्रकाशित अहवाल चुकीचा असून लेखकांच्या  कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. अहवालातील दाव्यात सुसंगती नसून अस्पष्टता आढळते. या अभ्यासातील निष्कर्ष आणि प्रस्थपित कोविड-१९ मृत्युप्रमाण प्रारूप, यात विसंगतीदेखील दिसते.  यामुळे हा अहवाल विश्वासार्ह ठरत नाही, असं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे.

July 20, 2024 8:52 PM

views 18

बांगलादेशातून १ हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत

बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसक संघर्षाच्या काळात बांगलादेशातून सुमारे एक हजार भारतीय विद्यार्थी सुखरूप परत आले आहेत. यापैकी ७७८ विद्यार्थी जलमार्गाने, तर सुमारे दोनशे विद्यार्थी हवाई मार्गाने भारतात परत आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, तसंच चित्तगाँग, राजशाही, सिल्हेत आणि खुलना इथली सहायक उच्चायुक्तालयं स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढायला मदत करत आहेत, आणि बांगलादेशातल्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत अ...

July 20, 2024 3:54 PM

views 40

भूतानमध्ये तिसरी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चा

परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री आणि भूतानचे परराष्ट्र व्यवहार सचिव आउम पेमा छोद्जोन यांच्या सहअध्यक्षतेखाली तिसरी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चा आज भूतानमध्ये झाली. या बैठकीत १३ व्या पंचवार्षिक योजना कालावधी अंतर्गत विकास भागीदारीची विविध क्षेत्रे, त्यातलं सहकार्य आणि कार्यान्वयनाचे मार्ग, याबाबत चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर असून काल त्यांनी भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांची भेट घेतली.

July 19, 2024 8:33 PM

views 22

भारताला २०२७पर्यंत विकसित देश बनवण्यात क्रीडाक्षेत्राची महत्त्वाची भूमिका – क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय

भारताला २०२७ पर्यंत विकसित देश बनवण्यात क्रीडाक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं मांडवीय यांनी आज भारताचे ऑलिम्पिकपटू आणि पॅरालिम्पिकपटूंशी संवाद साधला. देशाच्या क्रीडापटूंना योग्य मदत आणि संधी मिळाल्या, तरच भारताला मिळणाऱ्या पदकांची संख्या वाढले आणि सरकार या दिशेने सरकार पावलं उचलत आहे, असंही त्यांनी सांगितलं. आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीवर प्रकाश टाकणाऱ्या पाथवे टू पॅरिस या पुस्तिकेचं प्रकाशन...

July 18, 2024 8:20 PM

views 20

जगातल्या पाच मोठ्या कोळसा खाणींपैकी दोन खाणी भारतात – कोळसा मंत्रालय

जगातल्या पाच सर्वात मोठ्या कोळसा खाणींपैकी दोन खाणी भारतात असल्याचं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेवरा आणि कुसमुंडा या दोन खाणी जगातल्या सर्वात मोठ्या कोळसा खाणींमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असून, त्या कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात आहेत. या दोन खाणी एकत्रितपणे वर्षाला १०० दशलक्ष टन पेक्षा जास्त कोळसा उत्पादन करत असून भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या ते १० टक्के इतकं आहे.

July 17, 2024 8:39 PM

views 28

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचं शिक्कामोर्तब

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. संघात ११७ खेळाडूंचा समावेश असून सोबत १४० तज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी असतील.   एथलेटिक्स प्रकारात सर्वाधिक २९ खेळाडूंची निवड झाली असून नेमबाजीसाठी २१ जण भाग घेणार आहेत. हॉकीसाठी १९, टेबल टेनिसकरता आठ आणि बॅडमिंटनसाठी सात खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील. मुष्टियुद्ध आणि तिरंदाजीसाठी प्रत्येकी ६, गोल्फ साठी ४ तर टेनिसकरता ३ खेळाडूंचा समावेश संघात केला आहे. याखेरीज जलतरण, नौकानयन, भारोत्तोलन, ज्युदो इत्...

July 17, 2024 2:00 PM

views 30

भारताचा जीडीपी वाढीचा दर ७ टक्के राहील, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी भारताच्या आर्थिक वाढीचा दर वीस शतांशांनी वाढून ७ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही नाणेनिधीने आपल्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकमध्ये भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा अंदाज ३० शतांशांनी वाढवून ६ पूर्णांक ८ दशांश टक्के केला होता.   संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या निरीक्षणात, भारताच्या ग्रामीण भागात खासगी खर्चामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेमुळे हा अंदाज वर्तवला आहे. यामुळे भारत ही जगातली सर्वात वेगवान व...