April 13, 2025 8:04 PM April 13, 2025 8:04 PM

views 7

भारत – रशिया राजनैतिक संबंधांना ७८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं सायकल रॅलीचं आयोजन

भारत आणि रशिया यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ७८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं आज नवी दिल्लीत एका सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत ३०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. यानिमित्तानं १९४१-१९४५ युद्धातल्या रशियाचा विजयोत्सवही साजरा केला गेला. भारतातले रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनीही यानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. 

April 10, 2025 1:49 PM April 10, 2025 1:49 PM

views 6

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला कास्यपदक

 तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा  २०२५ च्या पहिल्या टप्प्यात पुरुषांच्या संयुक्त सांघिक क्रीडाप्रकारात भारतानं कांस्य पदक पटकावलं आणि  भारताच्या खात्यात पहिलं पदक जमा झालं.   अभिषेक वर्मा, ऋषभ यादव आणि ओजस देवताळे यांच्या संघानं काल अमेरिकेतल्या ऑबर्नडेल इथं झालेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात डेन्मार्कचा २३०-२२३ असा पराभव केला.   भारतीय त्रिकुटानं उपांत्यपूर्व फेरीमध्ये ग्वाटेमालाचा २२०-२१८ असा पराभव केला होता, परंतु उपांत्य फेरीत इटलीकडून त्यांना थोड्या फरकानं पराभव पत्करावा लागला. 

April 10, 2025 10:35 AM April 10, 2025 10:35 AM

views 9

भारत फ्रान्सकडून २६ राफेल विमानं खरेदी करणार

भारत फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमानं लवकरच खरेदी करणार आहे. या २६ राफेल विमानांपैकी २२ विमानं एक आसनी आणि चार विमानं दोन आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार त्याची रचना करण्यात येईल असं संरक्षण सूत्रांनी म्हटलं आहे.   राफेल सागरी विमानांमुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार असून ,ही लढाऊ विमानं नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि त्यासारख्या विमानवाहू नौकांवर तैनात केली जाणार आहेत. राफेल विमानांमध्ये प्रगत शस्त्र प्रणाली आणि क्षेपणास्त्र असतील.

April 9, 2025 8:15 PM April 9, 2025 8:15 PM

views 4

भारत – अमेरिका परस्परांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी प्रयत्न – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

अमेरिकेने लादलेल्या अतिरीक्त आयात शुल्काचे काय परिणाम होतील याची पडताळणी भारत करत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका परस्परांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी प्रयत्न करत आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. भारतासाठी  अमेरिकेसोबतची जागतिक धोरणात्मक भागीदारी महत्वाची असून त्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचंही ते म्हणाले.  

April 6, 2025 9:35 AM April 6, 2025 9:35 AM

views 17

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके आज श्रीलंकेतल्या अनुराधापुरा इथं महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय मदतीने विकसित केलेला हा 'महो-ओमानथाई' रेल्वे मार्ग श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागाला राजधानी कोलंबोशी जोडेल,ज्यामुळं प्रादेशिक संपर्क वाढून आर्थिक विकासाला चालना मिळेल. याशिवाय 'महो-अनुराधापुरा' विभागातील प्रगत रेल्वे वाहतूक नियमन प्रणालीची पायाभरणीही आज करण्यात येणार आहे.  

April 4, 2025 1:48 PM April 4, 2025 1:48 PM

views 5

खाजगी गुंतवणूकीत भारत जगात दहाव्या स्थानावर

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महत्त्वपूर्ण खाजगी गुंतवणूकीत भारत  जगात दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संस्थेच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अहवाल २०२५ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.    या यादीत ६ हजार ७०० कोटी अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणूकीसह अमेरिका पहिल्या स्थानावर तर ७८० कोटी अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणूकीसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे. भारताची या क्षेत्रातली खाजगी गुंतवणूक सुमारे १४० कोटी डॉलर इतकी आहे.

April 3, 2025 8:22 PM April 3, 2025 8:22 PM

views 8

भारत भेटीमुळे अचंबित झाल्याची चिलीचे राअध्यक्ष ग्रॅबियल बोरिक फॉन्ट यांची प्रतिक्रिया

भारताबद्दल फार पूर्वीपासून आपल्याला कुतूहल होतंच, पण आता प्रत्यक्ष भारत भेटीमुळे आपण अचंबित झालो आहोत, अशी भावना चिलीचे राअध्यक्ष ग्रॅबियल बोरिक फॉन्ट यांनी आज व्यक्त केली. ते आज मुंबईत राजभवन इथे आले होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं. नवी दिल्ली इथे भारत आणि चिलीमध्ये ‘सामायिक आर्थिक भागीदारी करार’ झाला असून व्यापार आणि वाणिज्य याशिवाय आपला देश भारताशी कृषी उद्योग, संस्कृती, महत्वपूर्ण खनिज आणि विशेष करून चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचं ते यावेळी ...

April 3, 2025 8:20 PM April 3, 2025 8:20 PM

views 3

भारत आणि थायलंड या देशांमध्ये ६ सामंजस्य करार

भारत आणि थायलंड यांनी आज आयटी, सागरी क्षेत्र, लघु आणि मध्यम उद्योग, हातमाग आदी क्षेत्रात सहकार्य करण्याच्या दृष्टीने सहा सामंजस्य करार  केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री पेईतोंगटार्न शिनावात्रा यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार झाले. दोन्ही देशातली धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय या चर्चेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.   दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमधे धोरणात्मक संवाद वाढवणं, पर्यटन, संस्कृती आणि शिक्ष...

April 1, 2025 6:33 PM April 1, 2025 6:33 PM

views 17

टोकियो इथं तिसरा भारत – जपान संवाद

तिसरा भारत जपान संवाद आज जपानची राजधानी टोकियो इथं झाला. अंतराळ विज्ञान क्षेत्रात उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. अंतराळातल्या प्रकल्प आणि सुविधांविषयी आणि सुरक्षेविषयीचे मुद्दे चर्चेला आले. भारताच्या बाजूने इसरोचे वैज्ञानिक सचिव एम गणेश पिल्लई यांच्या नेतृत्वात तर जपानच्या बाजूने निःशस्त्रीकरण विभागाचे सचिव मुआनपुई सायावी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ या संवादात सहभागी झालं. या संवादाच्या पार्श्वभूमीवर उभय राष्ट्रातल्या आघाडीच्या उद्योजकांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.

April 1, 2025 6:16 PM April 1, 2025 6:16 PM

views 9

सर्वंकष आर्थिक भागिदारी करार करण्याच्या दृष्टीनं भारत – चिली यांच्यात सहमती

भारत आणि चिली यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी एक सर्वंकष आर्थिक भागिदारी करार करण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरु करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे. चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरीक फोन्ट यांच्या भारत भेटीबाबत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र सचिव पेरियासामी कुमारन यांनी ही माहिती दिली.    सध्या दोन्ही देशांमधे अंशत: व्यापार करार झालेला आहे. परस्पर हिताच्या दृष्टीनं व्यापक करार करण्याचं उद्दिष्ट आहे. भारताला कृषी उत्पादन निर्यातीचा विस्तार करायचा आहे, तर भारतीय बाजारपेठेत उपल...