May 21, 2025 1:19 PM May 21, 2025 1:19 PM

views 17

पंजाबमध्ये पाकिस्तानी घुसखोऱ्याकडून ३३० पाकिस्तानी रुपये जप्त

पंजाबमधल्या अमृतसर इथं एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलानं काल अटक केली. ही व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय सीमेच्या आत येण्याचा प्रयत्न करत होता, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला थांबवलं आणि ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३० पाकिस्तानी रुपये सापडले. सीमा सुरक्षा दलानं त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

May 11, 2025 8:16 PM May 11, 2025 8:16 PM

views 17

ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी, तर पाकचे ३५ ते ४० जवान ठार

पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी आज दिली.   लष्करी कारवाई महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई कारवाई महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती आणि नौदल कारवाई महासंचालक व्हाइस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत देऊन भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले.  &...

May 11, 2025 3:09 PM May 11, 2025 3:09 PM

views 11

पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी केल्यानंतर प्रधानमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेनादलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. युद्ध विरामाच्या घोषणेनंतर प्रधानमंत्र्यांनी काल घेतलेल्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर सुब्रह्मण्यम जयशंकर, संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. भारतानं पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरु ...

May 11, 2025 1:37 PM May 11, 2025 1:37 PM

views 16

भारत – पाकिस्तान शस्त्रसंधीचं जगभरात स्वागत

भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविराम करण्याच्या निर्णयाचं जगभरातल्या देशांनी स्वागत केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी  युद्धविरामाचं स्वागत केलं असून उभय देशांनी विकासावर भर द्यावा असं आवाहन केलं आहे. हा करार शाश्वत शांततेसाठी योगदान देईल आणि या दोन देशांमधील व्यापक, दीर्घकालीन समस्यांवर चर्चा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल अशी गुटेरस यांना आशा असल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टेफान डुजारिक यांनी सांगितलं.   युरोपीय संघाचे परराष्ट्रव्यवहार प्रमुख काजा कल्लास या...

May 9, 2025 3:23 PM May 9, 2025 3:23 PM

views 17

पाकिस्तान सीमेवरच्या तणावासंदर्भात भारताची वेगवान पावलं

पाकिस्तान बरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वेगवान पावलं उचलली आहेत. विविध स्तरांवर संरक्षण विषयक मुद्यांवर चर्चा होत असून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.   देशाच्या पश्चिम सीमेवरची सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिं...

May 9, 2025 3:51 PM May 9, 2025 3:51 PM

views 17

भारतीय दलांच्या हालचाली, कारवायांचं थेट प्रक्षेपण करू नये – संरक्षण मंत्रालय

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, वृत्तवाहिन्या, डिजिटल मंच आणि वार्ताहरांनी भारतीय सशस्त्र दलांच्या हालचाली आणि कारवायांचं थेट प्रक्षेपण करू नये, अशी सूचना संरक्षण मंत्रालयानं आज केली. अशी संवेदनशील आणि गोपनीय माहिती प्रसारित केल्यामुळे सशस्त्र दलांच्या कामात अडथळा येऊन नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.   दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, चंदीगढ, हिमाचल प्रदेशसह काही...

May 9, 2025 1:48 PM May 9, 2025 1:48 PM

views 11

पाकिस्तानचे हल्ले संरक्षण दलांनी केले निष्फळ

भारताच्या  उत्तर आणि पश्चिम भागातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सेनादलांनी काल रात्री हाणून पाडला आहे. जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर इथं आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या भागातल्या लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला परंतु भारतीय लष्कराने तत्पर कारवाई करत तो राखला. जम्मू सतवारी, सांबा, आर एस पुरा आणि आर्निया इथं पाकिस्तानच्या दिशेनं आलेली ८ क्षेपणास्त्र मधेच रोखून निकामी करण्यात आली. सीमासुरक्षा दलानं काल जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न ह...

May 8, 2025 8:19 PM May 8, 2025 8:19 PM

views 17

…तर, पाकिस्तानाला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारताचा इशारा

IndiaPakistanWar यापुढं केलेली कोणतीही आगळीक केवळ परिस्थिती चिघळवणारी असेल, आणि त्यावर सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा स्पष्ट इशारा भारतानं दिला आहे.    सध्या पाकिस्तानबाबत सुरू असलेली परिस्थिती आणखी चिघळवण्याचा भारताचा हेतू नाही, मात्र लष्करी हल्ले झाले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत भारत-इराण संयुक्त आयोगाच्या विसाव्या बैठकीत बोलताना सांगितलं.    आज संध्याकाळी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्...

May 7, 2025 9:11 PM May 7, 2025 9:11 PM

views 18

भारताचा पाकिस्तानवर हवाई हल्ला, ९ दहशतवादी तळ उद्धवस्त

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमधे दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त झाले आहेत. परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त  वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी सुरु झालेली ही मोहीम दीड वाजता संपली. गेली ३० वर्षं पाकिस्ताननं पुरवलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे इथं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. पा...

May 7, 2025 7:02 PM May 7, 2025 7:02 PM

views 9

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पूंछ, राजौरी, कुपवाडा, बारामुल्ला भागात पाकिस्तानच्या लष्करानं नियंत्रण रेषेच्या आसपास  जोरदार गोळीबार केला. यात १५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४३ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबीराला भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर दिलं. या गोळीबारात या भागातल्या अनेक घरांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.