July 8, 2025 8:09 PM July 8, 2025 8:09 PM
7
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझिल दौऱ्यावर, विविध क्षेत्रात सामंजस्य करार होणार
ब्राझिलच्या दौऱ्यावर असलेले प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचं आज ब्राझिलिया शहरातल्या आल्वोराडा पॅलेसमध्ये राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी औपचारिक स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आज ब्राझीलच्या अध्यक्षांसमवेत व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याबाबत चर्चा करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर भारत आणि ब्राझील चार करारांवर स्वाक्षऱ्या करतील अशी अपेक्षा असल्याची माहिती भारताचे ब्राझीलमधले राजदू...