October 14, 2025 1:23 PM October 14, 2025 1:23 PM

views 31

आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात ६.३३ शतांश टक्के वाढ

२०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ११ लाख ८९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात ६ पूर्णांक ३३ शतांश टक्के वाढ झाल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे.   १ एप्रिल ते १२ ऑक्टोबर या काळात कंपनी करापोटी सुमारे ५ लाख २ हजार कोटी, तर वैयक्तिक करापोटी  सुमारे ६ लाख ५६ हजार कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. समभाग हस्तांतरणावरच्या  करातून ३० हजार ८७८ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

July 20, 2025 2:54 PM July 20, 2025 2:54 PM

views 13

मुंबईत आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘सायक्लोथॉन’चं आयोजन

१६६व्या आयकर दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून मुंबईत आयकर विभागाने आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. अभिनेता जॉन अब्राहम, क्रिकेटपटू शिवम दुबे, ॲथलेटिक अंजु बॉबी जॉर्ज हे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ४००हून अधिक जणांना सहभाग घेतला होता. पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना प्रोत्साहन देण्यासाठी सायक्लोथॉनचं आयोजन केल्याचं मनोगत मुंबईतल्या आयकर विभागाच्या प्रमुख मालती श्रीधरन यांनी यावेळी व्यक्त केलं.