डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 14, 2025 1:23 PM | Income Tax Mumbai

printer

आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात ६.३३ शतांश टक्के वाढ

२०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ११ लाख ८९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात ६ पूर्णांक ३३ शतांश टक्के वाढ झाल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे.

 

१ एप्रिल ते १२ ऑक्टोबर या काळात कंपनी करापोटी सुमारे ५ लाख २ हजार कोटी, तर वैयक्तिक करापोटी  सुमारे ६ लाख ५६ हजार कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. समभाग हस्तांतरणावरच्या  करातून ३० हजार ८७८ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.