May 10, 2025 12:51 PM May 10, 2025 12:51 PM
6
तेलंगणामध्ये ३८ माओवाद्यांचं आत्मसमर्पण
तेलंगणामध्ये काल ३८ माओवाद्यांनी भद्रादी कोठागुडम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये ८ महिला आणि २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातले आहेत. यंदाच्या जानेवारी महिन्यापासून या जिल्ह्यातल्या २ ६५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. शरण आलेल्या माओवाद्यांना राज्य सरकारकडून पुनर्वसनाचे सर्व लाभ दिले जातील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.