June 5, 2025 7:37 PM June 5, 2025 7:37 PM

views 16

राज्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

 राज्यात येत्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात - पुणे , नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाड्यात - छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, तर विदर्भात - नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ,...

May 29, 2025 1:43 PM May 29, 2025 1:43 PM

views 29

देशात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्रप्रदेशचा  किनारपट्टी भाग, आणि झारखंडच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर देशाच्या ईशान्येकडेच्या प्रदेशात पुढले ७ दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.    दरम्यान, पश्चिम राजस्थानमध्ये उद्या उष्णतेची लाट राहील आणि धुळीचं वादळ येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

May 28, 2025 8:11 PM May 28, 2025 8:11 PM

views 24

देशाच्या सर्व भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागानं उद्या आसाम, मेघालय, कर्नाटकाचा किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरुणाचल प्रदेश,ओडिशा,तेलंगणा,पश्चिम बंगाल आणि सिक्कीम इथेही उद्या जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. उत्तराखंड, बिहार, छत्तीसगढ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, झारखंड, कोकण,गोवा,मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश इथेही जोरदार पर्जन्यमान होईल असा अंदाज आहे. ईशान्य भारतात पुढचे ७ ...

May 28, 2025 4:56 PM May 28, 2025 4:56 PM

views 15

देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस जास्त पडण्याचा अंदाज

देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. देशात यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन लवकर झालं आहे. पुढच्या महिन्यात वायव्य भारतात काही भागांमध्ये तसंच मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची  शक्यता आहे. कर्नाटकचा किनारी भाग, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा इथं काही ठिकाणी पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थि...

May 27, 2025 2:54 PM May 27, 2025 2:54 PM

views 11

देशातल्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्तीसगड, केरळ, पश्चिम बंगाल, मराठवाडा, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, अंदमान निकोबार बेटे, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यातही येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   तर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा अंदाज वर्तवला आहे. आज हिमा...

May 14, 2025 12:20 PM May 14, 2025 12:20 PM

views 8

नैर्ऋत्य मोसमी पाऊस येत्या ३-४ दिवसात पुढे सरकेल

नैर्ऋत्य मोसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या ३-४ दिवसात मान्सून आणखी पुढं सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, पडण्याची शक्यता हवामान विभागाने वरतवली आहे. राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या. &...

April 8, 2025 6:59 PM April 8, 2025 6:59 PM

views 14

राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज

राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात बहुतांश भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

March 31, 2025 9:00 PM March 31, 2025 9:00 PM

views 18

मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात 13 अंशपर्यंत तफावत

मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात १३ अंश सेल्सिअसपर्यंत तफावत दिसून आल्याचं रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेसनं जारी केलेल्या विश्लेषणात नमूद केलं आहे. १ ते २२ मार्च या कालावधीत वसई पूर्व आणि घाटकोपरमधे सरासरी ३३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तर याच काळात पवईमधे सरासरी २०  अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होतं. हा फरक १३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यावर स्थानिक बाबी विचारात घेऊन उपाययोजना केली पाहिजे, अशी अपेक्षा या विश्लेषणात व्यक्त केली आहे. तापमानातला हा फर...

March 31, 2025 8:10 PM March 31, 2025 8:10 PM

views 8

मराठवाडा आणि लगतच्या भागात एक चक्रीय स्थिती  निर्माण-IMD

मराठवाडा आणि लगतच्या भागात एक चक्रीय स्थिती  निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमार्गे एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगड ते मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली.    राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं ४२ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी किमान तापमान गो...

March 31, 2025 9:13 PM March 31, 2025 9:13 PM

views 15

भारतात यंदा एप्रिल ते जून कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता-IMD

भारतात यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामानशास्त्रविभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. देशाच्या मध्य, पूर्व आणि वायव्य भागात या काळात सहसा ४ ते ७ उष्णतेच्या लाटा येतात. यंदा त्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणचे अपवाद वगळता तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरयाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीस...