November 29, 2025 2:46 PM
25
इफ्फी महोत्सवाची रंगतदार सोहळ्यानं सांगता
५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल एका रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली. पणजीमधे गेले ९ दिवस चाललेला सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरला. दिग्दर्शन अॅश मेफेअर दिग्दर्शित, व्हिएतनामच्या स्किन ऑफ यूथ या चित्रपटानं या महोत्सवाचा मुकुटमणी असलेल्या सूवर्ण मयूर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. गोंधळ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार आपल्या नावे केला, अभिनयाच्या श्रेणीत, कोलंबियन अभिनेता उबेमर रिओस यांना ए पोएट मधील भूमिकेसाठी ...