November 21, 2025 7:36 PM

views 43

इफ्फीमध्ये राजदुतांची परिषद संपन्न, मास्टरक्लासलाही सुरुवात

पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली. या क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं. या परिष...

November 21, 2025 6:42 PM

views 42

IFFI 2025: ‘फिल्म बाजार’ या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन

पणजी इथे सुरू असलेल्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर या दोन चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं. इफ्फी फिल्म बाजार या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन सुरू करण्यात आलं आहे. राज्य शासनातर्फे चित्रपटकर्मींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, बाजार विभागात सहभागी झालेले दोन्ही चित्रपट आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विविध उपक्रमांची माहिती या दालनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 

November 21, 2025 2:41 PM

views 54

IFFI 2025: ‘सहनिर्मिती’ या विषयावर राजदूतांची परिषद

पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली. भारत आज संपूर्ण जगासाठी स्टुडिओ म्हणून उभा राहात असून भारताचं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र पुढच्या १० वर्...