January 7, 2025 7:06 PM
14
‘भारतपोल’ आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील-अमित शाह
‘भारतपोल’ पोर्टल आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं सीबीआयनं विकसित केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचं उदघाटन करताना बोलत होते. हे पोर्टल तपास यंत्रणा आणि सर्व राज्यांच्या पोलिसांना १९५ देशांच्या इंटरपोल नेटवर्कशी जोडून गुन्हेगारीचं नियंत्रण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं ते यावेळी म्हणाले. आतापर्यंत भारतात गुन्हे करून इतर देशांमध्ये आश्रय घेणारे...