June 1, 2025 6:53 PM June 1, 2025 6:53 PM
13
येत्या निवडणुकीत पश्चिम बंगालमधे भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होईल-गृहमंत्री
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधे भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते कोलकाता इथं आयोजित सभेला संबोधित करत होते. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालच्या राज्य सरकारवर शहा यांनी यावेळी जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात भ्रष्टाचार, हिंसाचार वाढला असून महिला असुरक्षित असल्याचं शहा यांनी म्हटलं. मागील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्यांबद्दल चिंता व्यक्त करत तृणमूल काँग्रेस बंगालमधे लोकशाही रा...