August 3, 2024 1:01 PM August 3, 2024 1:01 PM

views 4

वीज अंगावर पडून बिहारमध्ये 8 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या २४ तासात वीज अंगावर पडून किमान आठ जणांचा मृत्यू झाला. पटना आणि औरंगाबाद इथं प्रत्येकी ३ आणि नावदा आणि सरन इथं प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना चार लाख रूपयांच्या अर्थसहाय्याची घोषणा केली आहे. नागरिकांनी पाऊस पडत असताना शेतीच्या कामासाठी घराबाहेर पडणं टाळावं असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.

August 1, 2024 3:40 PM August 1, 2024 3:40 PM

views 13

कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातले ७५ बंधारे पाण्याखाली असून, २३ मार्ग बंद आहेत. सांगली जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.   पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढले काही दिवस जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ...

July 31, 2024 7:25 PM July 31, 2024 7:25 PM

views 13

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ

राज्यात विविध ठिकाणी नद्यांच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधे पाणीसाठा वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरण ९० टक्के भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून ६०९ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे जलाशयापर्यंत प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी काळजी घ्यावी असं आवाहन पाटबंधारे विभागाने केलं आहे.   सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २९ टी.एम.सी.पेक्षा जास्त पाणीसा...

July 31, 2024 10:07 AM July 31, 2024 10:07 AM

views 17

देशाच्या बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा

तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, आणि दक्षिण कर्नाटकात तसंच उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदिगड, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत उद्या अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभांगानं वर्तवला आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत तो हळूहळू उत्तरेकडे सरकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. तर,महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुण्यात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरु लागलं आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्राम...

July 26, 2024 7:38 PM July 26, 2024 7:38 PM

views 2

पुण्यात स्वच्छता मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली. यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शासकीय विश्रामगृह आयोज...

July 26, 2024 4:05 PM July 26, 2024 4:05 PM

views 13

रायगड आणि सातारा तसंच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली. यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांनी ही काळजी घ्यावी, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.   मुसळधार पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्...

July 25, 2024 7:22 PM July 25, 2024 7:22 PM

views 9

मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे, प्रशासनाचा निर्णय

जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये ६६ टक्क्यापेक्षा जास्त भर पडली आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईत सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात येत्या २९ जुलै पासून मागे घेण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे.

July 25, 2024 7:27 PM July 25, 2024 7:27 PM

views 18

राज्यात बचावकार्य वेगानं सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश् परिस्थिती आहे, तिथं बचाव कार्य वेगानं सुरु आहे, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असेल तरच, घराच्या बाहेर पडावं असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

July 25, 2024 7:14 PM July 25, 2024 7:14 PM

views 13

पावसामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत

राज्याच्या विविध भागांमध्ये आज पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं. पुण्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे पुणे शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. सिंहगड रस्त्यावर एकता नगरमध्ये NDRF आणि लष्कराच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीची पाहणी केली. दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे फेरपरीक्षेला उपस्थित राहता आलं नाही, त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सा...

July 25, 2024 7:19 PM July 25, 2024 7:19 PM

views 8

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

राज्यात अतिवृष्टीमुळं हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी, अशी मागणी विधानसभेतला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.   अलमट्टी धरणामुळं कोल्हापूर, सांगली या शहरांना पुराचा धोका होऊ नये, यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली आ...