November 27, 2024 2:58 PM

views 22

तामिळनाडूच्या किनारी भागाला मुसळधार पावसाचा इशारा

फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या किनारी भागाला मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. तसंच आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांनी पुढचे तीन दिवस बंगालच्या उपसागरात, तामिळनाडूच्या किनाऱ्यावर आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. 

October 21, 2024 4:15 PM

views 26

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे शेतपीकांचं नुकसान

नाशिकमध्ये विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरची शेतातली पिकं जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे ७६ हजार ५८८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चांदवड, देवळा, कळवण, त्रंबक आणि बागलाणमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मका, कांदा भातपिकांचं तसंच द्राक्ष पिकांचं नुकसान झालं आहे.

September 26, 2024 8:49 AM

views 12

पुण्यात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प, आजही अतिवृष्टिचा इशारा

पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टिमुळं जनजीवन ठप्प झालं. प्रचंड वाहतुक कोंडीमुळं लोकांचे तासनतास रस्त्यावरच गेले. आजही पुणे शहर आणि परिसराला अतिवृष्टिचा लाल बावटा फडकवण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील शाळांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सुटी जाहीर केली आहे.

September 22, 2024 2:09 PM

views 23

विदर्भात पुढचे पाच दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भात पुढचे पाच दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मराठवाडा इथं पुढचे दोन दिवस तर मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा इथं मंगळवार ते शुक्रवार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, छत्तीसगड इथं पुढचे चार दिवस तर नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा इथं पुढील सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

September 22, 2024 1:57 PM

views 21

बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सुल्तानगंज आणि रतनपूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं या मार्गावरील रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून गंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. गंगा आणि अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं पटणा, वैशाली आणि बेगूसराय यांसह १२ जिल्ह्यांत पूर आला आहे. याचा फटका १० लाखांहून अधिक नागरिकांना बसला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल पटणा आणि वैशाली य...

September 12, 2024 1:07 PM

views 33

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ४ दिवसांत जोरदार पाऊसाचा अंदाज

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आगामी चार दिवसांत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. तसंच बिहार, ओडिशा, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथे उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारत, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पुढच्या आठवड्यात होऊ शकेल.

September 12, 2024 10:43 AM

views 16

भंडारा-गोंदियाला अतिवृष्टीचा फटका

महाराष्ट्राच्या, भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे दीड मीटरने तर 6 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आली आहेत. दरम्यान वैनगंगा नदीवर पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणारी क्रेन पुराच्या प्रवाहात वाहून गेली असून या क्रेनला आठ किलोमिटर अंतरावर पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे.  

September 11, 2024 2:29 PM

views 14

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.   गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सारखा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे....

September 9, 2024 5:59 PM

views 20

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याच्या मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवण्याच्या सूचना  मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. वसमत तालुक्यातील माळवटा, किन्होळा आणि कुरूंदा इथल्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या  भागाची पाहणी पाटील यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. 

September 5, 2024 9:37 AM

views 17

अतिवृष्टीग्रस्त भागात पंचमाने न करता नियमानुसार आर्थिक मदतीची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी शेतीपिकाच्या नुकसानाचे पंचमाने न करता, अतिवृष्टीच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. काल बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही घोषना केल्याचं आमचे वार्ताहरने कळवलं आहे. दरम्यान, परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बैठक घेत, नुकसानग्रस्त पीक पाहणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची सूचना कृषीमंत्र्यांनी केली. परभणी जिल्ह्यातही पिकांच्या नुकसानाची मुंडे यांनी काल पाहणी केली.