May 21, 2025 1:38 PM
16
देशातल्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता
कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यालगत तसंच घाट विभागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसाम, मेघालय, गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंढीगढ, उत्तर प्रदेशात २६ मे पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.