June 16, 2025 12:51 PM

views 7

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून राज्याच्या उत्तर भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ११ जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर केली आहे. रात्रीचा प्रवास करणारे प्रवासी आणि डोंगराळ भागातील पर्यटकांसाठी सुरक्षेसाठीचे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. येत्या गुरुवारपर्यंत केरळ-कर्नाटक-लक्षद्वीप किनारपट्टीलगत मासेमारी न करण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

June 16, 2025 12:47 PM

views 10

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. राज्यातल्या शाळा आजपासूनच सुरु झाल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि पालकांची पावसाने तारांबळ उडवली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी येत असून पुढचे दोन दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. घाटमाथ्यावरही पावसाचं मान असून व...

June 13, 2025 9:51 AM

views 15

कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू

कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीलगतचा भाग, उत्तरेकडील बेळगावी, धारवाड, गडग, हवेरी, दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलूर, कोडगू, शिवमोगा आणि दावणगेरे इथं जोरादार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.

June 13, 2025 8:54 AM

views 14

राज्याच्या विविध भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार पावसाची तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

June 11, 2025 8:35 PM

views 32

कोकण, गोवा तसंच दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता

मान्सून साधारणपणे येत्या आठवड्यात सक्रिय होईल. कोकण, गोवा तसंच  दक्षिण भारतात  काही ठिकाणी १२ ते १६ या कालावधीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवा़डा, छत्तीसगढ, अंदमान निकोबार, तमिळनाडू तसंच पुद्दूचेरी कराईकल आदी भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहतील तर देशाच्या  वायव्येकडील भागात तसंच पश्चिम हिमालयीन प्रदेशांमध्ये उष्णतेची लाट असेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.

June 6, 2025 3:43 PM

views 22

देशात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

आसाम आणि मेघालयमध्ये तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडच्या इतर राज्यांमधे, तसंच केरळ, माहे कर्नाटकचा किनारी भाग आणि पश्चिम बंगाल मधला हिमालयीन प्रदेश इथं येत्या ७ दिवसात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, कर्नाटकाचा आतला भाग, मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमधे उद्यापर्यंत सोसाट्याचे वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमधे आज वातावरण उष्ण आणि दमट राहील.

June 4, 2025 2:43 PM

views 20

देशाच्या ईशान्य भागात पूरस्थितीमुळे जनजीवन प्रभावित

देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी संवाद साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मणिपूरमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्यातली ६४३ गावं पुरामुळं बाधित झाली असून, एक लाख ६४ हजार ८०० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. पुरात ३५ हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी ८१ मदत छावण्या उभारल्या आहेत. राज्यात...

May 31, 2025 7:46 PM

views 21

आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा उद्या अतिमुसळधार पाऊस

दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड इथं  येत्या  ४ जूनपर्यंत वादळी  वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाचा  पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुराच्या काही ठिकाणी  उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच येत्या ४ जूनपर्यंत केरळ, माहे, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वादळ, विजांच्या  कडकडाटसह  वारे वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

May 30, 2025 7:41 PM

views 17

धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस

राज्यात गेल्या २४ तासात धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४२ पूर्णांक २ दशांश मिलीमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात २४ मिलीमीटर, तर जालना जिल्ह्यात १३ पूर्णांक ९ दशांश मिलीमीटर इतक्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सध्या  राज्यात परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही.    धाराशिव जिल्ह्यात वाहतुकीचे मार्ग अतिवृष्टीमुळे बदलण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली घाटावर दरड कोसळली होती पंरतु आता या मार्गावरची  वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. महाडमधल्या इंडो अमाईन्स या कंपनीमध्य...

May 29, 2025 1:43 PM

views 36

देशात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्रप्रदेशचा  किनारपट्टी भाग, आणि झारखंडच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर देशाच्या ईशान्येकडेच्या प्रदेशात पुढले ७ दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.    दरम्यान, पश्चिम राजस्थानमध्ये उद्या उष्णतेची लाट राहील आणि धुळीचं वादळ येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.