August 19, 2025 7:29 PM August 19, 2025 7:29 PM

views 19

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. बेस्ट बसगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले.      ठाणे जिल्ह्यात भिवंडी, मुंब्रा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तसंच वाहतुकीलाही फटका बसला. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ८ नागरिकांची सुटका करण्यात आली.      सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा-बारा...

August 4, 2025 1:10 PM August 4, 2025 1:10 PM

views 2

देशात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

अरुणाचल प्रदेश, आसामसह मेघालय, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. बिहार, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, पश्चिम बंगालमधला गंगा खोऱ्याचा भाग, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

July 15, 2025 7:41 PM July 15, 2025 7:41 PM

views 12

राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली.    रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून, सध्या वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. तसंच  दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यात गेल्या २४ तासांत  १४३ पूर्णांक ११ मिलिमीटर पावसाची नोंद  झाली. जगबुडी, शास्त्री आणि कोदवली य...

July 9, 2025 3:40 PM July 9, 2025 3:40 PM

views 6

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, बचावकार्य सुरू

विदर्भात बहुतांश जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून अनेक रस्ते बंद झाले आहेत तसंच नद्या आणि नाले दुथडी भरुन वाहत आहेत. वर्धा इथं यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा ते राळेगाव रस्ता बंद झाला आहे. नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं बचाव कार्य सुरू केलं आहे. नागपूर रेल्वे स्थानकात पाणी भरलं असल्यानं रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. नरेंद्र नगर रेल्वेच्या पुलावर पाणी आल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. शहरात अनेक भागात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून पावसाचं प...

July 9, 2025 9:26 AM July 9, 2025 9:26 AM

views 13

राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं पुराची शक्यता लक्षात घेत १८ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली लहान नौका उल...

June 23, 2025 10:27 AM June 23, 2025 10:27 AM

views 15

देशातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. महाराष्ट्रातही येत्या 24 तासात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस पडेल. तर कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

June 17, 2025 8:04 PM June 17, 2025 8:04 PM

views 18

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा

सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, झारखंड आणि देशाच्या अन्य भागात उद्यापर्यंत जोरदार ते अती जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर  बिहार, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात आज विजांच्या लखलखाटासह वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे.    येत्या शुक्रवारपर्यंत दिल्लीसह हरियाणा, पंजाब, आणि उत्तरप्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

June 16, 2025 3:24 PM June 16, 2025 3:24 PM

views 6

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे दापोलीतून दाभोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ बंद झाली होती. संगमेश्वर तालुक्यात धामणी-गोळवलीतल्या आमकरवाडीत काल रात्री पडलेल्या अतिपावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग खाली आला. चार-पाच फूट उंचीची पोफळीची ७० रोपं मातीखाली गाडली गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राजापूरमध्ये अर्जु...

June 16, 2025 1:38 PM June 16, 2025 1:38 PM

views 13

पश्चिम किनारपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गुजरातमध्ये पुढील दोन दिवस जोरदार वारे आणि पाऊस पडेल. वायव्येकडची राज्यं आणि दिल्लीत काल तापमान कमी झालं. मान्सून अद्याप पुढे सरकला  नसला तरी कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारीभागात जोरदार पाऊस पडत आहे.अशी माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक आर के ज्ञानमणी यांनी आकाशवाणीला दिली.

June 16, 2025 12:51 PM June 16, 2025 12:51 PM

views 5

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत असून राज्याच्या उत्तर भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ११ जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर केली आहे. रात्रीचा प्रवास करणारे प्रवासी आणि डोंगराळ भागातील पर्यटकांसाठी सुरक्षेसाठीचे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. येत्या गुरुवारपर्यंत केरळ-कर्नाटक-लक्षद्वीप किनारपट्टीलगत मासेमारी न करण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.