July 2, 2024 1:13 PM

views 15

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा  अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

June 27, 2024 11:49 AM

views 23

येत्या २४ तासात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे

June 25, 2024 8:25 PM

views 26

देशात काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पश्चिम बंगालच्या, हिमालयाकडच्या भागांत, आणि सिक्कीममध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातल्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती राहील, तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढचे पाच ते सहा दिवस हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.   पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि रा...

June 24, 2024 6:41 PM

views 17

धुळ्यात चिमठाणे, दुसाणे मंडळात ढगफुटी

धुळे जिल्ह्यात काल रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. चिमठाणे तसेच दुसाने मंडळातल्या दराणे, दुसाने, एैंचाळे, हत्ती, चिमठाणे इत्यादी गावांना ढगफुटीसारख्या पावसानं मोठा तडाखा दिला. दराणे, रोहाणे गावातून वाहणार्‍या पाटली नाल्याला मोठा पूर आला. काठावरची शेती तसंच शेतकर्‍यांच्या घरादारांमध्ये, खळ्यांमध्ये गोठ्यांमध्ये पाणी शिरले, गुरं-ढोरं वाहून गेली. काही ठिकाणी शेतात पेरणी केलेले बियाणं वाहून गेलं आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळली.    आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सन...

June 23, 2024 3:05 PM

views 18

केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढचे चार दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा

केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढचे चार दिवस अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भाग आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाजवळच्या भागात पुढचे पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पुढचे दोन ते तीन दिवस विजांचा गडगडाट आणि जोराच्या वाऱ्यांचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि दिल्लीच्या तुर...

June 19, 2024 8:41 PM

views 13

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे १३ जणांचा मृत्यू

चीनमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस,पूर आणि भूस्खलनासारख्या घटनांमध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला. शंघान्ग इथे गेल्या २४ तासात सतत पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम सुमारे साडे सहासष्ट हजार लोकांच्या जीवनावर पडला आहे. या घटनांमध्ये कित्येक लोक बेपत्ता झाले आहेत.  

June 16, 2024 8:37 PM

views 42

चीनमधल्या ग्वांगशी झुआंग स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर

जोरदार पावसामुळे चीनमधल्या ग्वांगशी झुआंग या स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर आला आहे. पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याचं ग्वांगशी झुआंगमधल्या ३० जलविज्ञान केंद्रांनी म्हटलं आहे. तर फुजिआन प्रांतात दरड कोसळल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. चीनमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर येण्याचा इशारा चीन सरकारने नागरिकांना दिला आहे.

June 16, 2024 8:39 PM

views 24

सिक्किममध्ये मुसळधार पावसामुळे अडकलेल्या बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

सिक्किममध्ये मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्याने अडकलेल्या बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून, मंत्री शेरिंग भुतिया स्वतः रस्ते आणि हवाई मार्गाने पर्यटकांच्या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग तसंच स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.   मुख्यमंत्री प्रेसिंग तमांग यांनी मेल्लीबाजारला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. तसंच पाटबंधारे विभागाशी प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चाही केली. पावसाळ्यानंतर कायमस्वरुपी प...