August 3, 2025 2:21 PM August 3, 2025 2:21 PM

views 22

पोर्तुगालमध्ये उष्णतेची लाट,तापमान ४४ अंशांवर पोहोचण्याची शक्यता

पोर्तुगालमधे आज उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच जंगलातल्या वणव्यांमुळे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत उष्णता आणि वणव्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं पोर्तुगालच्या गृहमंत्री मारिया लुसिया यांनी सांगितलं.   उत्तर आफ्रिकेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमान सतत वाढत असून पोर्तुगालमध्ये सध्या ३९ ठिकाणी जंगलात आग लागली आहे. यापैकी ९ ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर आहे.

June 9, 2025 3:14 PM June 9, 2025 3:14 PM

views 12

जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तर भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता

जम्मू काश्मीरमध्ये सांबा आणि जम्मू इथं उष्णतेची लाट आली असून गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे. सांबा इथं काल ४३ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस तर जम्मू मध्ये ४२ पूर्णांक ७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. येत्या पाच दिवसात जम्मू आणि परिसरात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या उष्ण दिवसांमध्ये अतिनील किरणांची तीव्रता वाढल्यानं ते आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला ही हवामान वि...

April 24, 2025 1:58 PM April 24, 2025 1:58 PM

views 6

देशातल्या ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता

उत्तर प्रदेश, बिहार ओदिशा, झारखंड, छत्तीसगढ,विदर्भ आणि पश्चिम बंगालचा काही भाग इथे येत्या शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. ईशान्य भारतासह, पूर्व राजस्‍थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्‍ली इथे हवेतला उष्मा कायम राहण्याचा तर पूर्वेकडे तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण भारतात या काळात  कर्नाटक, आंध्र किनारपट्टी, रायलसीमा, केरळ, तामिळनाडू या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा हवामानखात्याचा अंदाज आहे. 

April 8, 2025 6:59 PM April 8, 2025 6:59 PM

views 14

राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज

राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात बहुतांश भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

April 8, 2025 3:46 PM April 8, 2025 3:46 PM

views 7

देशातल्या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभागाने आज राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हरयाणा, चंडिगढ, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे...

April 7, 2025 12:59 PM April 7, 2025 12:59 PM

views 15

देशातल्या ‘या’ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओदिशातल्या २१ शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशासह अन्य भागांतही उष्णतेच्या झळा तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुजरातमध्ये कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये रात्रीही तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित गुजरात, उर्वरित राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशाचा पश्चिम ...

March 25, 2025 7:17 PM March 25, 2025 7:17 PM

views 15

उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचा इशारा

राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असून संभाव्य उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत. सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरच्या साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. राज्यात २१ मार्चपर्यंत उष्माघाताचे २१ रुग्ण आढळून आले आहेत.

March 19, 2025 3:22 PM March 19, 2025 3:22 PM

views 12

आपत्ती व्यवस्थापन धोरणांमध्ये उष्णतेच्या लाटेसारख्या आपत्तींचा समावेश करण्याची सूचना

केंद्र सरकारनं आपत्ती व्यवस्थापन धोरणांमध्ये उष्णतेच्या लाटेसारख्या नवीन आपत्तींचा समावेश करावा, अशी सूचना एका संसदीय समितीनं केली आहे. गृहविभागाशी संबंधित असलेल्या या संसदीय समितीनं गेल्या आठवड्यात या संदर्भातला अहवाल राज्यसभेत सादर केला होता. या अहवालात ज्या घटना आपत्तींच्या यादीत समाविष्ट आहेत, त्यांचा नियमित आढावा घेण्यासाठी आणि ही यादी अद्ययावत करण्यासाठी एका स्वतंत्र प्रणालीची शिफारसही समितीने केली आहे. तसंच, हवामान बदल आणि त्यासंबंधित आपत्तींच्या वाढत्या वारंवारतेविषयी दीर्घकालीन नियोजनाच...

March 16, 2025 8:06 PM March 16, 2025 8:06 PM

views 16

देशाच्या विविध भागात उन्हाचा कडाका !

येत्या दोन दिवसात विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तर तेलंगणा, पश्चिम बंगाल, सौराष्ट्र तसंच कच्छ या भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ओदिशालाही आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला असून पुढचे दोन दिवस झारखंड आणि पश्चिम बंगालला यलो अलर्ट देण्यात आहे.   दरम्यान, उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेशात पुढच्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्य...

March 15, 2025 10:14 AM March 15, 2025 10:14 AM

views 6

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा 39 ते 40 अंशांच्या आसपास होता; सोलापुरातही काल तापमान 41 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.   आज विदर्भात काळी ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.