जम्मू काश्मीरमध्ये सांबा आणि जम्मू इथं उष्णतेची लाट आली असून गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे. सांबा इथं काल ४३ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस तर जम्मू मध्ये ४२ पूर्णांक ७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. येत्या पाच दिवसात जम्मू आणि परिसरात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या उष्ण दिवसांमध्ये अतिनील किरणांची तीव्रता वाढल्यानं ते आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला ही हवामान विभागानं दिला आहे.
Site Admin | June 9, 2025 3:14 PM | heat wave
जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तर भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता
