November 6, 2025 1:39 PM November 6, 2025 1:39 PM

views 19

गाझा पट्टीत हमासविरोधातली कारवाई सुरूच ठेवणार असल्याची इस्राएलची घोषणा

इस्राएलचं लष्कर गाझा पट्टीत आपल्या ताब्यातल्या प्रदेशात हमासविरोधातली  कारवाई आणि  त्यांनी बनवलेली भुयारं  नष्ट करण्याचं काम सुरूच ठेवणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटलं आहे. राफाहमध्ये अडकलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना गाझामध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात परतण्याची परवानगी द्यावी, असं आवाहन अमेरिकेनं केलं होतं. त्यानंतर काट्झ यांनी ही भूमिका जाहीर केली. गाझा पट्टीचं नि:शस्त्रीकरण करणं, तसंच मृत ओलिसांचे मृतदेह परत मिळवणं हे इस्राएलचं  उद्दिष्ट असल्याचं त्...

June 1, 2025 10:02 AM June 1, 2025 10:02 AM

views 22

अमेरिकेच्या इस्रायल समर्थित युद्धबंदी प्रस्तावाला हमासचा प्रतिसाद

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्य पूर्वेतील राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मध्यस्थांना सादर केलेल्या इस्रायल समर्थित युद्धबंदी प्रस्तावाला हमासनं प्रतिसाद दिला आहे. काही पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात 10 जिवंत इस्रायली बंधक आणि 18 मृत बंधकांना सोडण्यास आपण तयार असल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमासनं प्रस्तावित युद्धबंदी योजनेत बदल करण्याची मागणीही केली आहे.

March 27, 2025 11:04 AM March 27, 2025 11:04 AM

views 12

हमास आणि इस्राइल यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पॅलेस्टाईन नागरिकांनी निदर्शने

हमास आणि इस्राइल यांच्यात सुरू असलेल युद्ध तत्काळ थांबवाव या मागणीसाठी काल शेकडो पॅलेस्टाईन नागरिकांनी गाजा पट्टीच्या उत्तर भागात निदर्शने केली. हातात युद्धाच्या विरुद्ध फलक झळकवत आणि घोषणा देत त्यांनी ही निदर्शने केली.   गेले 17 महीने चाललेल्या या युद्धमुळे गाजा पट्टी पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. इस्राइलने आपल्या बंधकांना मुक्त करण्यासाठी हमासवर दबाव आणण्यासाठी या महिन्याच्या 2 तारखेपासून इस्राइलने सर्व प्रकारच साहाय्य बंद केल असून त्यामुळे मानविय दृष्टिकोनातून नागरिकांची स्थिति अधिक गंभीर झाली ...

March 23, 2025 8:17 PM March 23, 2025 8:17 PM

views 21

इस्रायल-हमास युद्धात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायल-हमास युद्धात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले असल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. या संघर्षात सुमारे १ लाख १३ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. आज ही ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली. गेल्या आठवड्यात इस्रायलने अचानक हवाई हल्ले करत युद्धबंदी संपवल्यापासून ६७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण आकडेवारीत सैन्य आणि नागरिक असं विभाजन मंत्रालयानं केलेलं नाही.

March 21, 2025 1:41 PM March 21, 2025 1:41 PM

views 21

हमासचे इस्त्राइलवर रॉकेट हल्ले

इस्रायलनं गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्यानंतर हमासने प्रथमच प्रत्युत्तरादाखल तेल अविववर रॉकेट हल्ले केले आहेत. त्यापैकी एक रॉकेट निकामी करण्यात आलं असून इतर दोन रॉकेट निर्जन क्षेत्रात पडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं सांगितलं.   दरम्यान, गाझामध्ये हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, इस्रायल मध्यरात्रीपासून करत असलेल्या हवाई हल्ल्यात किमान ८५ जणांचा मृत्यू झाला असून मंगळवार पासून आतपर्यंत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १३३ जण जखमी झाले आहेत. हमासने अजूनही ५९ जणां...

February 15, 2025 3:02 PM February 15, 2025 3:02 PM

views 12

हमासच्या कैदेतून मुक्त होणाऱ्या ३ ओलिसांची नावे जाहीर

इस्रायलनं आज गाझा पट्टीतल्या हमास या पॅलेस्टिनी सशस्त्र गटाच्या    कैदेतून मुक्त होणाऱ्या तीन ओलिसांची नावं जाहीर केली. इस्राईल आणि पॅलेस्टिन यांच्यात गेल्या महिन्यात झालेल्या युध्दविरामनानंतर दोन्ही देशांमध्ये ओलीसांची देवाणघेवाण करण्याची ही सहावी वेळ आहे.   पॅलेस्टिन सुटका करणार असलेल्या तीन ओलिसांच्या बदल्यात इस्रायलकडून 369 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होण्याची शक्यता असल्याचं हमासच्या कैद्यांसंदर्भातल्या माध्यम विभागानं सांगितलं. या कैद्यांमध्ये 36 जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत तर  333 ...

February 12, 2025 8:38 PM February 12, 2025 8:38 PM

views 13

हमास बरोबरची युद्धबंदी संपवणार, इस्राइलच्या प्रधानमंत्र्यांचा इशारा

गाझा पट्ट्यातल्या ओलीस ठेवलेल्या इस्राइली नागरिकांची येत्या शनिवारपर्यंत सुटका केली नाही तर हमास बरोबरची युद्धबंदी संपवण्यात येईल असं सांगून त्यानंतर इस्राइल हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवेल असा इशारा इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे. या निर्णयाला इस्राइलच्या मंत्रीमंडळानंही मान्यता दिल्याचं नेतान्याहू यांनी काल एका ध्वनीचित्रफितीद्वारे सांगितलं. येत्या शनिवारी ओलिसांची सुटका करण्याचं पुढं ढकलल्याची घोषणा हमासनं केल्यानंतर नेतान्याहू यांनी हा संदेश दिला आहे.

February 9, 2025 8:01 PM February 9, 2025 8:01 PM

views 16

युध्दविरामासाठी गाझाच्या मुख्य भागातून इस्त्रायली फोजांची माघार सुरु

हमास आणि इस्रायलमधल्या युध्दविरामाचा भाग म्हणून गाझाच्या  मुख्य भागातून इस्त्रायली फौजेच्या तुकड्या आजपासून परतायला लागल्या आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना या युध्दविरामाच्या करारानुसार आपण पावलं उचलत असलो तरी या कराराची पुढची वाटचाल ही दोन्ही बाजूंवर अवलंबून  असल्याचं नमूद केलं. युद्धविरामाचा भाग म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांना नेतझरिम हद्द ओलांडून उत्तरेकडच्या भागात जाण्याची परवानगी इस्रायलने दिली आहे. गेले पंधरा महिने सुरु असलेल्या या संघर्षाला विराम  मिळाल्याच्या भावनेने अनेक पॅलेस...

January 30, 2025 5:12 PM January 30, 2025 5:12 PM

views 15

इस्रायल – हमास ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार

युद्धविराम कराराचा भाग म्हणून इस्रायल आणि हमास आज तिसऱ्या टप्प्यात ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार आहेत. इस्रायलच्या तीन कैद्यांच्या बदल्यात गाझात अटक करण्यात आलेल्या तीन थाई नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे. देवाणघेवाणीचा चौथा टप्पा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं दोन्हीकडच्या उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या इस्रायली कैद्यांना सोडायचं या करारात ठरलं आहे. या बदल्यात इस्रायल १ हजार ९०० पॅलेस्टिनी ओलिसांना सोडणार आहे. 

January 20, 2025 1:12 PM January 20, 2025 1:12 PM

views 22

इस्रायल-हमास यांच्यातील युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटका कराराची अंमलबजावणी

गाझात हमासच्या कैदेतून सुटलेले पहिले ३ बंधक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी कराराच्या पहिल्या दिवशी काल इस्रायलच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल.    इस्रायलनं हमाससोबत झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी या सुटकेचं श्रेय बायडन प्रशासन आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ट्रा...