January 19, 2025 8:31 PM

views 42

इस्रायल आणि हमास यांच्यात सहा आठवड्यांचा युद्धविराम

इस्रायल आणि हमास यांच्यातल्या सहा आठवड्यांचा युद्धविराम आज तीन तासांच्या विलंबानं सुरू झाला. सध्या सुरू असलेला  संघर्ष निवळण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असून युद्धविरामाची सुरूवात झाल्याच्या वृत्ताला आज मध्यस्थ देश कतारनं पुष्टी दिली आणि सुरुवातीला सुटका होणाऱ्या तीन बंदिवानांपैकी काहीजण परदेशी नागरिक असल्याचं सांगितलं.   सुटका होणाऱ्या ओलिसांची यादी मिळाली असून यासंबंधीच्या तपशीलांची तपासणी सुरक्षायंत्रणा करत आहेत असं इस्रायलचे प्रधानमंत्री नेत्यान्याहू यांनी समाजमाध्यमावर सांगितल...

January 19, 2025 1:48 PM

views 24

हमासबरोबरची युद्धबंदी लांबणीवर टाकल्याची इसराएलची घोषणा

इस्रायलनं हमासबरोबरची गाझामधली युद्धबंदी लांबणीवर टाकली आहे. मुक्तता करायचं ठरवलेल्या पहिल्या ओलीसांची यादी जोवर हमासकडून प्राप्त होत नाही तोवर युद्धविराम अंमलात येणार नाही, असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं.   भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता लागू होणार असलेला युद्धविराम सुरू न करण्याचे निर्देश नेत्यान्याहू यांनी संरक्षण दलांना दिले असल्याचं इस्रायलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हमासनं मात्र हा विलंब तांत्रिक कारणांमुळे झाल्याचं म्हटलं आहे. युद्धविराम कर...

January 16, 2025 8:57 PM

views 27

मतदानासाठी विलंब केल्याचा इस्राइलचा हमासवर आरोप

गाझा पट्टीतली युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठीच्या करारावर मतदानासाठी विलंब केल्याचा आरोप इस्राइलने हमासवर केला आहे. मात्र, हमासने हा आरोप फेटाळून लावला असून युद्धबंदीसाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे. येत्या रविवारपासून या कराराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या करारानुसार, इस्रायली सैन्य गाझा पट्टीतून हळूहळू माघार घेईल आणि या युद्धबंदीला सुरुवात होईल. तसंच इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमासने ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली जाईल, असं या करारात नमूद करण्यात आलं आहे. 

October 18, 2024 2:54 PM

views 52

हमासचा प्रमुख याह्या सिनवार इस्राईलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात ठार

इस्राईलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात हमासचा प्रमुख याह्या सिनवार मारला गेला. सिनवार ज्या इमारतीमध्ये लपला होता, त्यावर इस्राईलनं बॉम्ब हल्ला केला.मात्र, हमासनं सिनवारच्या मृत्यूला अद्याप दुजोरा दिलेला नाही. सिनवर हा हमासच्या राजनैतिक विभागाचा प्रमुख होता. तसंच तो इस्माइल हानिए याचा उत्तराधिकारी होता. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला इस्राईलवर झालेल्या हल्ल्याचा सिनवार हा प्रमुख सूत्रधार होता. दरम्यान, अजून हे युद्ध संपलेलं नाही, असं इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतान्याहू यांनी सांगितलं. काही आठव...

October 6, 2024 3:48 PM

views 40

हमास दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण

गाझा पट्ट्यात हमास या अतिरेकी संघटनेनं इस्त्राईलवर हल्ला केला त्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्लयात इस्‍त्राईलच्या १२०० नागरिकांचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यात आतापर्यंत ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे. संयुक्‍त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी हमास संघटनेनं ओलीस ठेवलेल्या इस्‍त्रायली नागरिकांची विनाशर्त सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. या युद्धामध्ये आता लेबनॉनसह इराणही सहभागी झाल्यामुळं त्याची व्याप्ती दिवसेंदिव...

October 2, 2024 11:53 AM

views 36

इराणनचा इस्त्राईलवर क्षेपणास्त्र हल्ला

हिजबुल्लाह आणि हमास या अतिरेकी संघटनांच्या काही प्रमुख नेत्यांना मारल्याचा बदला म्हणून इराणनं इस्त्राईलवर काल क्षेपणास्त्र हल्ला केला. काल रात्री उशिरा पर्यन्त इराणनं इस्राइल वर 180 क्षेपणास्त्र डागली. इस्राइलच्या तेल अविव आणि जेरूसेलेम या दोन प्रमुख शहरांवर हा क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानं नागरिकांनी बॉम्ब रोधक ठिकाणांचा आश्रय घेतला. या हल्ल्यामुळे काल दिवसभर इस्त्राईल मध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी सतत भोंगे वाजत होते. दरम्यान, कालच्या हल्ल्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही ...

July 31, 2024 12:56 PM

views 33

हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिये यांची तेहरानमध्ये हत्या

हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिये याची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या झाली. इराणचे अध्यक्ष मसौद पेझेश्कियान यांच्या शपथविधी समारंभासाठी इस्माइल हानिये तेहरानला आला असताना त्याच्या घरी एका अंगरक्षकासह त्याला ठार करण्यात आल्याची माहिती इराणच्या ‘इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअर’नं दिली आहे. याबद्दल अधिक तपशील देण्यात आलेले नाहीत. हानिये हा हमासचा मुख्य चेहरा होता आणि अनेक शांतता चर्चांमध्ये तो सहभागी होता.