September 29, 2024 3:04 PM September 29, 2024 3:04 PM

views 2

गुजरातमधल्या द्वारका इथं बस अपघातात ७ ठार, १५ जखमी

गुजरात राज्यात द्वारका जिल्ह्यात रस्त्यावर बससमोर आलेल्या गुराला वाचवताना बसचालकाचं बसवरचं नियंत्रण गेल्याने बस दुभाजक तोडून समोरच्या तीन गाड्या आणि एका मोटारसायकलला फरफटत घेऊन थांबली. काल रात्री उशीरा झालेल्या या अपघातात ७ जण ठार झाले तर १५ जण जखमी झाले आहेत.

September 25, 2024 8:31 PM September 25, 2024 8:31 PM

views 24

गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १ जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त प्रवासी शामलाजी इथे देवदर्शनासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर त्यांची गाडी भरधाव वेगात ट्रेलरवर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला.

September 11, 2024 3:24 PM September 11, 2024 3:24 PM

views 3

गुजरातमध्ये कच्छ विभागात अज्ञात तापामुळे ११ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये कच्छ विभागातल्या अबदासा आणि लाखपत इथं गेल्या काही आठवड्यात एका अज्ञात तापामुळे अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे. राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या सोळा मृत्यूंपैकी ११ मृत्यू अज्ञात तापामुळे झाले असून पाच मृत्यू इतर आजारामुळे झाल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री ऋषीकेश पटेल यांनी सांगितलं.

September 6, 2024 10:14 AM September 6, 2024 10:14 AM

views 12

गुजरातमध्ये सूरत इथे ‘जलसंचय जन भागीदारी’ अभियानाचा प्रधानमंत्र्याच्या हस्ते आज शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत इथे, दूरस्थ माध्यमातून, 'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. सध्या सुरू असलेल्या 'जल शक्ति अभियानाशी' हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था,उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात 'रेन हार्वेस्टींग' करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाअंतर्गत, गुजरातमध्ये सामुदायिक भागीदारीतून सुमारे २४ हजार ८०० बांधकामं केली ज...

August 7, 2024 11:24 AM August 7, 2024 11:24 AM

views 15

गुजरातमधील 45 हून अधिक धरणं पूर्ण भरल्यानं विसर्ग सुरू, दक्षतेचा इशारा

गुजरातमधील 45 हून अधिक धरणं पूर्ण भरल्यानं विसर्ग सुरू असून त्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या सरदार सरोवर धरणात 60 टक्के पाणीसाठा झाला आहे.   दक्षिण गुजरातमधील मुसळधार पावसानंतर या विभागातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उकाई धरणातही पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, हवामान विभागानं उद्या राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

July 20, 2024 11:24 AM July 20, 2024 11:24 AM

views 11

गुजरात, कोकण, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर अतीवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.     तसंच मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात आगामी 4 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या प्रदेशात आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ...

July 20, 2024 10:29 AM July 20, 2024 10:29 AM

views 11

गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे पुरस्थिती, जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये, सौराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, राज्यातील सुमारे 57 गावांना पुराचा फटका बसला आहे. देवभूमी द्वारका आणि पोरबंदर हे दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असून इथे गेल्या 36 तासांत 20 इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.     राज्य आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दहा तुकड्या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आहेत. पुरा...

July 15, 2024 2:46 PM July 15, 2024 2:46 PM

views 13

गुजरातमध्ये अहमदाबाद-बडोदा द्रुतगती मार्गावरील अपघातात ६ जणांचा मृत्यू

गुजरातमधल्या अहमदाबाद बडोदा द्रुतगती मार्गावर आज सकाळी आनंद जवळ झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. आज पहाटे चिकोरी गावाजवळ एका बसचा टायर फुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याचवेळी आलेल्या भरधाव ट्रकने या बसला धडक दिली. या अपघातात बसचा चालक आणि इतर पाचजण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.