June 3, 2025 1:36 PM June 3, 2025 1:36 PM

views 18

ग्रीस आणि टर्कीमध्ये भूकंपाचे धक्के

ग्रीसमध्ये टर्कीच्या सीमेजवळ आज सकाळी डोडेकेनीज बेटांवर ६ पूर्णांक २ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्याच सुमाराला टर्कीमध्ये किनारपट्टी भागातल्या मारमारिस शहरालाही भूकंपाचा धक्का बसला. तो ५ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा होता. यामध्ये  मारमारिस शहरातले दोन नागरिक जखमी झाले.

January 3, 2025 1:47 PM January 3, 2025 1:47 PM

views 13

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरु

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कालपासून सुरु झाला. या पाच देशांच्या जबाबदारीचं प्रतीक म्हणून त्यांचे ध्वज रोवण्याचा कार्यक्रम काल सुरक्षा परिषदेच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात झाला. इक्वाडोर, जपान, माल्टा, मोझाम्बिक आणि स्वित्झरलँड यांची जागा या देशांनी घेतली आहे.

August 13, 2024 9:47 AM August 13, 2024 9:47 AM

views 13

ग्रीसमध्ये वणवे अथेन्समधल्या उपनगरांपर्यंत पसरले

ग्रीसमध्ये वणवे अथेन्समधल्या उपनगरांपर्यंत पसरले आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांना घरं सोडावी लागली आहेत. अनेक घरं, मोटारींना आगी लागल्या आहेत आणि रस्ते राख आणि धुरानं भरून गेले आहेत. आग सलग दुसऱ्या दिवशी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे सरकारनं युरोपीय संघातील सदस्य देशांकडून मदत मागवली आहे. अनेक शाळा आणि व्यवसायांच्या संकुलांनाही धोका निर्माण झाल्याचं अग्निशमन विभागानं म्हटलं आहे.