May 3, 2025 6:37 PM May 3, 2025 6:37 PM

views 7

लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू

गोव्यात शिरगाव इथल्या लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी आज पहाटे प्रचंड गर्दी झाली होती.   यावेळी भाविकांमध्ये अचानक गोंधळ माजून धक्काबुक्की झाली आणि अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडून जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण दल यांनी घटनास्थळी पोचून त्यांनी मदतकार्य सुरु केलं. जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून ग...