May 1, 2025 8:13 PM May 1, 2025 8:13 PM

views 3

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत घट

इंधन कंपन्यांनी आज व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या. मुंबईत या सिलेंडरचा दर  आता १ हजार ७१३रुपये ५० पैशांऐवजी १ हजार ६९९ रुपये  तर दिल्लीत १ हजार ७४७ रुपये ५० पैसै झाला आहे.  घरगुती वापराच्या १४ किलो वजनी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल केलेला नाही.

March 31, 2025 8:28 PM March 31, 2025 8:28 PM

views 4

APM नैसर्गिक वायूची उद्यापासून ४ टक्क्यांनी किंमत वाढीला मंजुरी

APM अर्थात जुन्या खाणीतून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत उद्यापासून ४ टक्क्यांनी वाढवायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यामुळं सीएनजी, पीएनजी महागण्याची शक्यता आहे.    साडे ६ डॉलर MMBtu वरुन हा दर पावणे ७ डॉलर MMBtu झाला आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच ही दरवाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री मंडळानं एप्रिल २०२३ मध्येच याला मंजुरी दिली होती.