August 23, 2025 7:12 PM August 23, 2025 7:12 PM

views 9

गणेशोत्सवात राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचं लोकार्पण

महाराष्ट्रातल्या  घरगुती, सार्वजनिक, गणेशोत्सवाला राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या निमित्त राज्य उत्सवगीताचं आणि ganeshotsav.pldmka.co.in यापोर्टलचं राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईतल्या वांद्रे इथं लोकार्पण करण्यात आलं. राज्यातल्या  सुमारे १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रूपये प्रमाणे भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं.  यासाठी २३ ऑगस्ट पासून  ६ सप्टेंबर पर्यंत mahaanudan.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नो...

August 19, 2025 7:58 PM August 19, 2025 7:58 PM

views 5

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या

राज्यातल्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेनं गाड्यांच्या ३६७ अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी गणेशभक्तांच्या वतीनं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी महाऱाष्ट्र शासनानं केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत, गणेशभक्तांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांच्या जादा फेऱ्यांचं नियोजन केलं जाईल, ...

August 14, 2025 7:12 PM August 14, 2025 7:12 PM

views 10

‘गणेशोत्सव’ आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’, शासन आदेश जारी

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठीचा शासन आदेश आज जारी करण्यात आला. याअंतर्गत भजनी मंडळांना ५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. राज्य सरकार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणार आहे. याशिवाय अध्यात्म नाट्यरंग महोत्सव आणि ड्रोन शोचं आयोजित केला जाईल. राज्यातल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकं देणं, राज्य व्याख्यानमालेचं आयोजन, राज्यातल्या प्रमुख गणेश मंदिरांचं तसंच सार्वजनिक गणेशोत्सवांचं ऑनलाईन दर्शन घेता यावं यासाठी पोर्ट...

July 23, 2025 3:38 PM July 23, 2025 3:38 PM

views 13

पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठ्या मूर्तींंचं विसर्जन समुद्रातच करण्याचं राज्य शासनाचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यात येतील, असं प्रतिज्ञापत्र आज राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. तसंच, विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येईल, असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. पीओपी मूर्तींवरच्या बंदीसंदर्भात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला होता. या गटाने काही शिफारसी आणि सूचना देणा...

July 19, 2025 3:40 PM July 19, 2025 3:40 PM

views 3

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन  रेल्वेनं येत्या २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावपर्यंत तसंच पुणे स्थानकापासून रत्नागिरीपर्यंत गाड्या प्रवास करतील. दिवा ते चिपळूण पूर्णपणे अनारक्षित गाडी २३ ऑगस्टला धावेल.    पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल पासून ठोकुर आणि सावंतवाडीपर्यंत वांद्रे ते रत्नागिरी, बडोदा तसंच विश्वामित्री ते रत्नागिरी अशा विशेष गाड्या धावतील.  पश्च...

September 12, 2024 9:28 AM September 12, 2024 9:28 AM

views 11

गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी आजपासून एसटीच्या अडीच हजार फेऱ्यांचं नियोजन

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळानं आजपासून अडीच हजार बस गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. आजच्या गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवाशांमध्ये वाढ होईल, हे गृहीत धरून 12 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबई, बोरीवली, ठाणे, पुणे आदी ठिकाणी जाणाऱ्या अतिरिक्त बसफेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. ऑनलाइन आरक्षण सुरू असून, गट नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुहागर तालुक्यातून सर्वाधिक 208 गाड्यांची गट नोंदणी करण्यात आल्याची माहिती...

September 7, 2024 3:17 PM September 7, 2024 3:17 PM

views 7

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई - पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आण...

September 5, 2024 3:45 PM September 5, 2024 3:45 PM

views 9

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सज्ज

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. चौपाटयांसह गणेश विसर्जन स्‍थळे, कृत्रिम तलाव या ठिकाणी पालिकेच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यंदा ६९ नैसर्गिक स्थळांबरोबरच २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे, तसेच गणेश मूर्ती संकलन केंद्रे आदी सुविधा पुरविण्यात आल्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली

August 24, 2024 4:07 PM August 24, 2024 4:07 PM

views 10

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ५ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ८ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत, ११ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापासून १३ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत तर १७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून १८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत ही बंदी लागू असेल. या कालावधीत अत्यावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट मिळेल.

August 2, 2024 2:31 PM August 2, 2024 2:31 PM

views 10

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली असून गणेश मंडळे महानगनपालिकेच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टवर जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. ज्या मंडळांनी गेल्या दहा वर्षात परवानगीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यांना पुढील ५ वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. त्यांना दरवर्षी त्यांच्या पर...