June 8, 2025 4:00 PM June 8, 2025 4:00 PM

views 10

French Open Tennis : स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि इटलीच्या जेन्निक सिन्नर यांच्यात विजेतेपदासाठी सामना

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि  इटालियन खेळाडू जेन्निक सिन्नर यांचा  सामना होईल. जेन्निक सिन्नर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तर अल्काराझ फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा गतविजेता आहे.  सामना संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होईल.   उपांत्य फेरीत सिनरनं नोवाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव केला तर अल्काराझविरुद्ध लोरेन्झो मुसेट्टीनं पायाच्या दुखापतीमुळं सामन्यातून माघार घेतली होती.   महिला एकेरीत, अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफन...

June 1, 2025 6:36 PM June 1, 2025 6:36 PM

views 7

French Open Tennis: भारताच्या रोहन बोपण्णाचा पराभव

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकाराच्या तिसऱ्या फेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा चेक जोडीदार अॅडम पावलासेक यांना स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. हेन्री पॅटन आणि हॅरी हेलिओवारा या जोडीने त्यांचा पराभव केला. या स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात स्पेनच्या कार्लोस अल्कराझ याचा सामना अमेरिकेच्या हिटिंग बेन शेल्टन याच्याशी होणार आहे.

May 28, 2025 2:43 PM May 28, 2025 2:43 PM

views 5

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अल्काराज, इगा आणि अरीना यांची लढत

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आज कार्लोस अल्काराज, इगा श्वियांतेक आणि अरीना साबालेंका मैदानात उतरतील. दरम्यान, सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डचा ६-३, ६-३, ६-३ असा सहज पराभव केला. पुरुष दुहेरीत आज भारताचा रोहन बोपण्णा त्याच्या जोडीदारासोबत अमेरिकेच्या जोडीशी लढत देईल. याशिवाय, युकी भांब्री, ऋत्विक चौधरी बोल्लीपल्ली हेदेखील आपापल्या जोडीदारांसोबत मैदानात उतरतील.

May 25, 2025 3:06 PM May 25, 2025 3:06 PM

views 4

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत रोहन बोपण्णा, युकी भांब्री, एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलिपल्ली हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील. पहिल्या फेरीत रोहन बोपण्णा याचा सामना चेक प्रजासत्ताकाच्या ॲडम पावलासेक याच्याशी होईल. पुरुष दुहेरी प्रकाराच्या पहिल्या फेरीत युकी भांब्री आणि त्याचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गेलोवे यांचा सामना नेदरलँड्सचा रॉबिन हासे आणि जर्मनीच्या हेंड्रिक जेबेन्स यांच्याशी होणार आहे. एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकन ज...